esakal | निमित्त मोकाट बैलाचे; तरुणासह वृद्ध दांपत्यास घरात घुसून मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

निमित्त मोकाट बैलाचे; तरुणासह वृद्ध दांपत्यास घरात घुसून मारहाण

"तुमच्या खळ्यातील बैल सुटला असून तो आमच्या खळ्यात घुसत आहे, बैल सापडला की त्याला मारूनच टाकतो" असे म्हणत वृध्द दामप्त्याला मारहाण केली.

निमित्त मोकाट बैलाचे; तरुणासह वृद्ध दांपत्यास घरात घुसून मारहाण

sakal_logo
By
भगवान जगदाळे

निजामपूर (धुळे): निमित्त होते मोकाट बैलाचे, त्यातून शाब्दिक बाचाबाची होऊन त्याचे पर्यावसान शिवीगाळ, दमदाटीत झाले; अन मग प्रकरण थेट घरात घुसून मारहाणीपर्यंत गेले. पीडित तरुणासह वयोवृद्ध दाम्पत्यास मारहाण झाल्याने प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोचले. मारहाण करणाऱ्या दोन्ही संशयितांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शेवटी घडलेला प्रकार उजेडात आला.

वाचा-  पोषण आहारपुरवठा अनियमिततेची ‘एसीबी’मार्फत चौकशी 

माळमाथा परिसरातील छडवेल-कोर्डे (ता.साक्री) येथील कमलेश विजय बेडसे (वय-24) या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी त्याच्या अंगणात बसलेला होता, तर त्याचे आजी, आजोबा घरात जेवण करत होते. तेवढ्यात गावातील संशयित महेंद्र खुशाल बेडसे व शेखर खुशाल बेडसे हे दोघेही तिथे आले व फिर्यादिस म्हटले की, "तुमच्या खळ्यातील बैल सुटला असून तो आमच्या खळ्यात घुसत आहे, बैल सापडला की त्याला मारूनच टाकतो" असे म्हणत होते. त्यावर फिर्यादीने बैल बांधून घेतो असे सांगितले, त्याचा संशयितांना राग आल्याने दोघेही शिवीगाळ करत फिर्यादीच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेले. त्यावेळी फिर्यादी घाबरून घरात पळून गेला.

आवश्य वाचा- कृषी विद्यालयातील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ 

संशयितांनी घरात घुसून फिर्यादी तरुणाला हाता-बुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली. तेव्हा फिर्यादी तरुणाची आजी अंजीराबाई बेडसे व आजोबा गुलाबराव बेडसे हे भांडण सोडविण्यासाठी आले असता संशयित महेंद्र बेडसेने अंजीराबाई बेडसे यांना कानशिलात लगावली, तर गुलाबराव बेडसे यांना खाली जमिनीवर ढकलून दिले. फिर्यादी तरुणास मारहाणीसह जीवे ठार मारण्याची धमकीही संशयित देत होते. दरम्यान गावातीलच काशिनाथ सोनवणे, दीपक बेडसे व मयूर साळुंखे यांनी हस्तक्षेप करत पीडित तरुणाची संशयितांच्या तावडीतून सोडवणूक केली. दरम्यान दोन्ही संशयित शिवीगाळ, दमदाटी व जीवे ठार मारण्याची धमकी देत तेथून निघून गेले. आज (ता.11) दुपारी दोन्ही संशयितांविरुद्ध निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजाराम बहिरम घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image