धुळ्यात चार महिला डॉक्‍टर कोरोना विषाणूच्या विळख्यात 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 June 2020

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरासह मध्यरात्रीपर्यंत शिरपूरला 10, धुळे महापालिका क्षेत्रात 11 आणि दोंडाईचा येथे दोन रूग्ण आढळल्यानंतर आज सायंकाळी धुळे शहरात पुन्हा तीन पॉझिटिव्ह रूग्ण सापडले. यात शहरातील अन्य ठिकाणासह हिरे शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाशी निगडीत चार महिला डॉक्‍टरांचा समावेश आहे.

धुळे : शहरासह जिल्ह्यात "कोरोना' पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या गेल्या वीस तासांमध्ये 23, तर आतापर्यंत एकूण 218 वर पोहोचली आहे. यात महापालिका क्षेत्रातील चार महिला डॉक्‍टर या आजाराच्या विळख्यात सापडल्या आहेत. तसेच साक्री रोडवरील एका खासगी दवाखान्यातील नर्सिंग स्टाफही बाधित झाला. या सर्वांवर उपचार सुरू आहेत. 

हेही पहा - धुळ्यात "कोरोना'चे रुग्ण; इतर आजाराच्या रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालय

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरासह मध्यरात्रीपर्यंत शिरपूरला 10, धुळे महापालिका क्षेत्रात 11 आणि दोंडाईचा येथे दोन रूग्ण आढळल्यानंतर आज सायंकाळी धुळे शहरात पुन्हा तीन पॉझिटिव्ह रूग्ण सापडले. यात शहरातील अन्य ठिकाणासह हिरे शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाशी निगडीत चार महिला डॉक्‍टरांचा समावेश आहे. शहरातील विश्‍वकर्मानगर, माधवपुरा, मोहाडी, अभय महिला महाविद्यालय परिसर, शिरपूर येथील पारधीपुरा, दोंडाईचात राणीपूरा, दादामिल भागात रूग्ण आढळले आहेत. आठ वर्षाच्या मुलीपासून वृध्द समाविष्ट आहेत. 
जिल्ह्यात एकूण रूग्णसंख्या 218 असताना 113 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच 25 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित 83 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. महापालिका क्षेत्रात 138 रूग्ण झाले असून 47 जणांवर उपचार सुरू आहेत. हे क्षेत्र वगळून जिल्ह्यात 80 रूग्णांची नोंद असून 36 बाधितांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती हिरे महाविद्यालय व जिल्हा सर्वोपचार रूग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक तथा कोविड नोडल ऑफिसर डॉ. राजकुमार सूर्यवंशी, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक शेजवळ, "सिव्हील'चे कोविड नोडल ऑफिसर डॉ. विशाल पाटील यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule four doctor corona positive detect