esakal | टाळी वाजविली अन गुंगी आली....काय आहे हा प्रकार पहा...  
sakal

बोलून बातमी शोधा

jwellary

चहा पिण्यास इच्छुक असल्याचे सांगत तो घरात आला. काहीवेळ बोलून त्याने गुंगी आणणारी पावडर हातात घेत टाळी वाजविली, त्यामुळे अरुण मोरे यांच्यासह कुटुंबीय बेशुध्द झाले.

टाळी वाजविली अन गुंगी आली....काय आहे हा प्रकार पहा...  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : बहाण्याने घरात आलेल्या एकाने गुंगीचे औषध देवून प्रौढाच्या घरातील 57 हजारांचे दागीने लुटून नेले. शहरातील साक्री रोड परीसरातील जलगंगा सोसायटीत प्रकर घडला असून शहर पोलिस ठाण्यात चार दिवसानंतर गुन्हा दाखल झाला. 
साक्री रोड जलगंगा सोसायटीत अरुण महारु मोरे (वय 53, रा. महादेव मंदिरासमोर, दक्षता सोसायटीजवळ) यांचे वास्तव्य आहे. गेल्या रविवारी सकाळी नऊच्या सुमारास अरुण मोरे अन्य सदस्यांसोबत घरी होते. त्यावेळी अनोळखी व्यक्ती आला, अर्जुन महाराज कदम असे त्याने स्वतःचे नाव सांगीतले. चहा पिण्यास इच्छुक असल्याचे सांगत तो घरात आला. काहीवेळ बोलून त्याने गुंगी आणणारी पावडर हातात घेत टाळी वाजविली, त्यामुळे अरुण मोरे यांच्यासह कुटुंबीय बेशुध्द झाले. तीन हजार शंभर रूपये, एक सोन्याची अंगठी, नऊ ग्रॅमची अंगठी, मंगलसुत्र, 
तीन ग्रॅमची चांदीची अंगठी असा एकुण 57 हजार 101 रूपयांचा ऐवज लंपास केला. काही वेळानंतर मोरे यांच्यासह कुटुंबीयांना शुध्द आली, त्यावेळी दागीने लूटल्याचे लक्षात आले. परीसरात विविध ठिकाणी शोध घेत चौकशी केली, परंतु अनोळखी व्यक्‍ती दिसली नाही. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात काल रात्री संशयित अर्जुन महाराज कदम याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला. सहाय्यक उपनिरीक्षक एन. एस. आखाडे तपास करीत आहेत. दरम्यान, पत्ता विचारण्यासह बहाण्याने घरात येत, काही जणांकडून दागीने लंपास केले जात आहेत. तसेच दागीन्यांना पॉलिशच्या बहाण्यानेही चोरीचे प्रकार होत आहेत, त्याच पध्दतीने आता चोरटे नवीन फंडा वापरत असून गुंगीचे औषध देत दागीने लंपास केले. नागरीकांनी सतर्कता बाळगून अज्ञाताला घरात घेऊ नये, काही संशयास्पद व्यक्‍ती आपल्या परीसरात आढळलयास पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

loading image