esakal | जॉर्जियात अडकले निजामपूरचे दोन विद्यार्थी!
sakal

बोलून बातमी शोधा

jorjiya student

जॉर्जियात हवामान बदल झाल्याने त्याठिकाणी बर्फवृष्टी होत आहे. परिणामी जॉर्जिया ते भारत विमानसेवाही बंद करण्यात आल्याने दोन्ही मुलं जॉर्जियात अडकून पडली आहेत.

जॉर्जियात अडकले निजामपूरचे दोन विद्यार्थी!

sakal_logo
By
प्रा.भगवान जगदाळे

निजामपूर-जैताणे (धुळे) : जॉर्जियात अडकलेल्या 100 भारतीय विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील निजामपूर (ता.साक्री) येथील दोन विद्यार्थ्यांचा समावेश असून जॉर्जिया विद्यापीठात वैद्यकीय उच्च शिक्षण घेणारे, एमबीबीएस द्वितीय वर्षाचे हे दोन्ही विद्यार्थी सख्खी भावंडे आहेत. 

नक्‍की वाचा - जनता कर्फ्यु : भुकेने व्याकुळ मनोरुग्णास दिले अन्न- पाणी

भाग्यश्री भालचंद्र कोठावदे (वय-२१) व मयूर भालचंद्र कोठावदे (वय-१९) अशी त्यांची नावे आहेत. त्यांचे पालक तथा आशापुरी मेडिकलचे संचालक भालचंद्र कोठावदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विदेश मंत्रालयाकडे मदतीची याचना केली आहे. मुलांची कोरोना टेस्ट करून स्वदेशी येऊ देण्याबाबतही त्यांनी विनंती केली आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मुले विदेशात अडकल्याने कोठावदे दाम्पत्य प्रचंड तणावाखाली आहे. जॉर्जियात हवामान बदल झाल्याने त्याठिकाणी बर्फवृष्टी होत आहे. परिणामी जॉर्जिया ते भारत विमानसेवाही बंद करण्यात आल्याने दोन्ही मुलं जॉर्जियात अडकून पडली आहेत. तेथील सरकारने अघोषित बंदी लागू केल्याने खाद्यपदार्थ मिळण्यासह मास्क, सॅनिटायझर आदी आवश्यक सामुग्री मिळण्यातही प्रचंड अडचणी येत आहेत, अशी माहिती भालचंद्र कोठावदे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. संबंधित विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी पंतप्रधान कार्यालय व विदेश मंत्रालयाशी संपर्क साधून मायदेशी परतण्यासाठी मदतीची मागणी केली आहे.!
 

loading image