तापीचा किनाऱ्यावर झाला अनोखा विवाह...गावभर चर्चा मात्र नवरदेव, नवरीच्या उंचीची ! 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

मंदिरात विधिवत पुजा, मंगल अष्टकांच्या सुरात मोजक्‍याच नातेवाईकांच्या उपस्थितीत या जोडप्याचा विवाह उत्साहात झाला.

धुळे ः देशात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असून गेल्या दिड महिन्यापासून देशात "लॉकडाऊन' सुरू आहे. त्यामुळे सर्वच व्यवहार, उद्योग-धंदे, समारंभ, धार्मिक कार्यक्रम तसेच जेथे मोठ्या प्रमाणात सुमदाय जमा होतो असे कार्यक्रम बंद करण्यात आले आहे. त्यात ऐन लग्नसराईत कोरोनामूळे अनेकांचे ठरलेले विवाह हे रद्द करावी लागली. तर काहींनी मोजक्‍याच नातेवाईंकांमध्ये लग्न लावून घेतले. असाच लॉकडाऊनच्या काळात अनोखा विवाह सोहळा धुळे जिल्ह्यातील शिरपुर तालुक्‍यातील भरवाडे येथे झाला. 

नक्की वाचा : खडसेंचा घणाघात...पक्षाने मला फसवले, पाठीत खंजीर खुपसला ! 
 

उंची लहान पण किर्ती महान अशी म्हण सर्वत्र प्रचलित आहे. अशाच विविध क्षेत्रातून आपल्या कलेने अनेकांची मने जिंकणारा भरवाडे येथील 29 वर्षीय झांबरु राजेंद्र कोळी आणि चार फूट उंची लाभलेली कुरखळी येथील 19 वर्षीय नयना कैलास कोळी यांचा विवाह तापी नदीच्या काठी जोगाई माता मंदिरात झाला. यावेळी मंदिरात विधिवत पुजा, मंगल अष्टकांच्या सुरात मोजक्‍याच नातेवाईकांच्या उपस्थितीत या जोडप्याचा विवाह उत्साहात झाला. 

क्‍लिक कराः आगामी काळात स्वयंशिस्त पालनच "कोरोना'पासून वाचविणार :जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे 
 

धुळ्यातील कमी उंचीचे जोडपे 
सर्वत्र कोरोनाचे सावट त्यात प्रत्येकाच्या मनात भितीचे वातावरण आहे. परंतू धुळ्यात "लॉकडाऊन' मध्ये सर्वात कमी उंचीच्या नवरदेव-नवरीचा विवाह झांबरु कोळी आणि नयना यांच्या लग्नात त्यांच्या जवळील नातेवाईक उपस्थित झाला. तो ही सर्व नियम पाळत विवाह झाला. या अनोख्या लग्नाचा मात्र धुळे जिल्ह्यात सर्वात कमी उंचीच्या नवरा आणि नवरीच्या लग्नाची चर्चा चांगलीच रंगलेली होती. 
 

आर्वजून पहा : धान्य खरेदीचा आता नवा ट्रेंड... ऑनलाइन शॉपिंगने घरपोच धान्य !
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule locdown peered small height couple marriage