esakal | धुळे महापौर निवडणूक १७ सप्टेंबरला..भाजपचा लागणार कस
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule Municipal Corporation

धुळे महापौर निवडणूक १७ सप्टेंबरला..भाजपचा लागणार कस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवाधुळे ः
महापालिकेच्या ( Dhule Municipal Corporation) पंचवार्षिक कार्यकाळातील दुसऱ्या अडीच वर्षासाठी नूतन महापौर निवडणुकीचा (Election of new mayor) कार्यक्रम विभागीय आयुक्तांनी (Commissioner) जाहीर केला आहे. त्यानुसार ११ सप्टेंबरपासून नामनिर्देशनपत्र प्राप्त करता येईल. यात १७ सप्टेंबरला महापौरपदासाठी निवडप्रक्रिया होईल. या पदासाठी येथे अनेक इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली असून, निवडीत सत्ताधारी भाजपचा (BJP) कस लागणार आहे.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात एकाच दिवसात लसीकरणाची ‘लक्षाधीश’ मजल


महापालिकेच्या डिसेंबर २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर पंचवार्षिक कार्यकाळातील पहिल्या अडीच वर्षासाठी महापौरपदाचा कार्यकाळ संपल्यामुळे दुसऱ्या अडीच वर्षासाठी महापौरांची निवड करावी लागणार आहे. यासाठी विभागीय आयुक्तांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार १७ सप्टेंबरला सकाळी अकराला महापालिकेत विशेष बैठक होईल. जिल्हाधिकारी जलज शर्मा पीठासीन अधिकारी असतील. महापौर निवडणुकीचा कार्यक्रम असा ः ११ ते १३ सप्टेंबर सकाळी अकरा ते दुपारी एकदरम्यान नामनिर्देशनपत्र प्राप्त करता येईल. १३ सप्टेंबरला सकाळी अकरा ते दुपारी दोनदरम्यान नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल. १७ सप्टेंबरला महापालिकेच्या सभागृहात सकाळी अकराला विशेष बैठक होईल. महापौरपद ओबीसी संवर्गासाठी असून, त्यात सत्ताधारी भाजपमधील अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. एकूण ७४ पैकी ५० नगरसेवक भाजपचे असून, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षांचे विरोधक भाजपला शह देऊ शकतील का, हा औत्सुक्याचा विषय आहे.

हेही वाचा: साथरोगांचे थैमान..मनपाची कुंभकर्णी झोप; भाजपचे आंदोलन


भाजपकडून निरीक्षकपदी दटके
धुळे महापालिकेत भाजपची सत्ता आहे. उर्वरित अडीच वर्षांच्या कालावधीसाठी होणाऱ्या महापौर निवडणुकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमदार प्रवीण दटके यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तसे पत्र श्री. पाटील यांनी भाजपचे धुळे शहर-जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांना पाठविले आहे.

loading image
go to top