esakal | धुळे महापालिकेला मिळाले चारशे रेमडेसिव्हिर इंजेक्शन !
sakal

बोलून बातमी शोधा

remdesivir

धुळे महापालिकेला मिळाले चारशे रेमडेसिव्हिर इंजेक्शन !

sakal_logo
By
निखील सुर्यवंशीधुळे ः कोरोनाप्रश्‍नी महापालिकेने मायलन कंपनीकडे सहा हजार ३०० रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी केली आहे. त्यात पंधराशे इंजेक्शनसाठीचा निधी कंपनीला दिला आहे. त्यातून चारशे इंजेक्शन गुरुवारी प्राप्त झाली. पैकी ५० हिरे मेडिकल कॉलेजसाठी विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ यांना उसनवार तत्त्वावर देण्यात आली.

हेही वाचा: कोरोना काळात..जळगाव शहरात दरमहा १०० ने वाढ

खासदार डॉ. सुभाष भामरे, महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजीज शेख, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, उपमहापौर कल्याणी अंपळकर, सभागृहनेते राजेश पवार, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, नगरसेवक नागसेन बोरसे, युवराज पाटील, भिकन वराडे, प्रवीण अग्रवाल, आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे, सहाय्यक आयुक्त तुषार नेरकर, नगरसचिव मनोज वाघ आदी उपस्थित होते.

हेही वाचा: जळगावात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळा बाजार करणारी टोळी पकडली

शहरात रेमडेसिव्हिरचा तुटवडा
डॉ. भामरे यांच्या हस्ते डॉ. शेजवळ यांच्याकडे इंजेक्शन सोपविण्यात आली. महापालिकेने बेंगळुरू येथील मायलन कंपनीकडून इंजेक्शन खरेदी केली आहेत. दरम्यान, महापालिकेत गुरुवारी स्थायी समिती सभेत सभापती संजय जाधव यांनी शहरात रेमडेसिव्हिरचा तुटवडा भासत असताना, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. भामरे, श्री. अग्रवाल आणि महापौर सोनार यांच्या प्रयत्नाने चारशे रेमडेसिव्हिर प्राप्त झाल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. तो मंजूर करण्यात आला.

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image