राष्ट्रवादीचे विलास खोपडेंचा घातपात की आत्महत्या? धुळ्यात तर्कवितर्क !

निखील सुर्यवंशी
Monday, 31 August 2020

खोपडे यांनी आत्महत्या केली की घातपात आहे, याविषयी तर्कवितर्क सुरू झाले. त्यांना इनोव्हा कार चालविताना कुणीही पाहिलेले नव्हते.

धुळे : येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी पदाधिकारी आणि महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती, माजी उपनगराध्यक्ष  विलास खोपडे यांचा मृतदेह रविवारी सायंकाळनंतर अक्कलपाडा मध्यम सिंचन प्रकल्पात सापडला. त्यामुळे धुळे शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. धुळे शहराच्या राजकारणातील ते एक प्रस्थ होते.

अक्कलपाडा मध्यम सिंचन प्रकल्पाजवळ इनोव्हा कार साक्री पोलिसांना दिसली. त्यावरून तपास सुरू झाला. पोलिसांना सायंकाळी एक अनोखळी मृतदेह सापडला. हाती लागलेल्या माहितीवरून पोलिसांनी तपास केला असता मृतदेह धुळे शहरातील विलास खोपडे यांचा असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ही वार्ता रात्री धुळे शहरात पसरल्यावर मोठी खळबळ उडाली. 

हेही वाचा ः धुळे महापालिकेत वर्षानुवर्ष ठाण मांडणाऱ्यांची होणार उचलबांगडी 

खोपडे यांनी आत्महत्या केली की घातपात आहे, याविषयी तर्कवितर्क सुरू झाले. त्यांना इनोव्हा कार चालविताना कुणीही पाहिलेले नव्हते. तसेच त्यांना ती कार चालवता येत असल्याबाबतही साशंकता व्यक्त झाली. तसेच खोपडे यांनी आत्महत्या करावी, असे ठोस कुठले कारणही नाही. ते आर्थिक स्थिरस्थावर होते. हॉटेल व्यावसायिक तसेच शेती असल्यामुळे त्यांना कुठल्या अडचणीही नव्हत्या, असे असताना ते आत्महत्या कशी करतील, असा प्रश्‍न त्यांच्या निकटवर्तीयांनी उपस्थित केला.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Murder or suicide of a NCP office bearer in Dhule