esakal | पांझरा नदीलगत नाल्यात विषारी रसायन..गावकऱ्यांमध्ये भिती
sakal

बोलून बातमी शोधा

पांझरा नदीलगत नाल्यात विषारी रसायन..गावकऱ्यांमध्ये भिती

पांझरा नदीलगत नाल्यात विषारी रसायन..गावकऱ्यांमध्ये भिती

sakal_logo
By
सुरज खलाणेनेर ः येथील अक्कलपाडा, तसेच भदाणे (ता. धुळे) शिवारातील हॉटेल फौजीजवळ पांझरा नदीलगत नाल्यातील पाण्यात अज्ञात व्यक्तीकडून रसायन (chemicals) सोडल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे प्रवाहात असणारे पाणी पिवळसर (water) झालेले आहे.अक्कलपाडा, नवे भदाणे, जुने भदाणे, देऊर, नेर आदी गावांसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी या पांझरा नदीकाठी आहेत. यामुळे ग्रामस्‍थांना धोका निर्माण होऊ नये म्‍हणून नेर येथे पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

हेही वाचा: जळगाव राष्ट्रवादीत गटबाजी..अन त्यावर अजितदादांचा प्रभावी ‘डोस’


नदीतून प्रवाहित होणाऱ्या पाण्याचा रंग पिवळसर झाला आहे. तसेच नदीपात्रातील काही प्रमाणात माशांचाही मृत्यू झाल्याचे दिसून आले. यामुढे मोठी दुर्घटना होऊ नये यासाठी नेर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ. सतीश बोडरे यांनी नेर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील महाले यांच्यासह आरोग्यसेवक एस. आर. परदेशी यांना विहिरीतील पाण्याचे नमुने तत्काळ तपासणीसाठी घ्यावेत, अशा सूचना केल्या. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतून पाण्याचे नमुने घेऊन धुळे जिल्हा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत.


नेर येथील पाणीपुरवठा बंद
नेर येथील सरपंच गायत्री जयस्वाल तसेच सदस्यांनी संपूर्ण गावासाठी दवंडीच्या माध्यमातून सूचना दिल्या आहेत. सध्या रसायनयुक्त पाण्याचा प्रवाह सुरू असल्यामुळे विहिरीतील पाणी दूषित होऊ शकते. यासाठी अंदाजे तीन, चार दिवसांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला असल्याचे ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना सूचना देण्यात आली.

हेही वाचा: कांदा पिकावर मर, होमनी, करपा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतेत


रसायनयुक्त टँकरने नाल्यात उपसा केल्याचा अंदाज
नाल्यालगत सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा आहे. यामुळे प्रवास करणाऱ्या टँकरचालकाने जवळ असणाऱ्या नाल्यातच टँकरमधील रसायनाचा उपसा केल्याचा अंदाज नवे भदाणे येथील ग्रामस्थांनी व्‍यक्‍त केला आहे. या रसायनयुक्त पाण्यामुळे नागरिकांची तसेच जनावरांची जीवितहानी होऊ नये यासाठी तहसील कार्यालयातील तसेच पाटबंधारे विभागातील पदाधिकारी, कर्मचारी यांनी झालेल्या घटनेचा तत्काळ पंचनामा करावा, अशी मागणी नेर गावातील ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते योगेश गवळे, नारायण बोडरे, ग्रामपंचायत सदस्य डॉ. लक्ष्मीकांत बोडरे, सुनील भागवत, भदाणे येथील कृष्णा खताळ, प्रकाश खलाणे, आर. डी. माळी, गणेश जयस्वाल, डॉ. सतीश बोडरे, देवीदास माळी, संतोष ईशी, राकेश जाधव, राकेश अहिरे, रावसाहेब खलाणे, जितेंद्र देवरे आदी ग्रामस्थांनी केली आहे.

loading image
go to top