अधिकाऱ्यांचा मनधरणीसाठी वाईन शॉपि मालकाने ठेवली पार्टीचे

अधिकाऱ्यांचा मनधरणीसाठी वाईन शॉपि मालकाने ठेवली पार्टीचे

सारंगखेडा : लॉकडाउनमुळे दारू वाचून तळीरामांचा कोरडा पडलेला घसा अखेर  ओला झाला , वाईन शॉपच्या मालकांनी ग्राहकांचे स्वागत केले . रात्रीची वेळ तर जणू थर्टी फर्स्ट ची होती , रात्रभर शेती वाडयात पाटर्या रंगल्या . अधिकाऱ्यांचा मनधरणी साठी वाईन शॉपि मालकाने पार्टीचे ही आयोजन केले होते.

नक्की वाचा :मालेगावात बंदोबस्ताला गैरहजर; आणखी दोघे पोलिस निलंबित

दारू दुकानदारांना अटी शर्तीवर परवानगी मिळाली सारंगखेडा येथील दारू दुकानदाराची वाईन भरलेली गाडी दुपारी तीन वाजता आली . वाईनची गाडी आली असे तळीरामाचा कानावर पडताच वाईन शॉपिजवळ गर्दी होऊ लागली .वाईन शॉपीमालकानेही तळीराम ग्राहकांचे स्वागत केले . आणि म्हणू लागले पी ले पी ले ओ मोरे राजा ... गावात चहाची दुकाने बंद असल्याने नागरिकांमध्ये चर्चेचा ठरत आहे.

आर्वजून पहा : इथे जगण्याची लढाई "त्यांची' अन आमची... 

दीड महिना उलटला तरी वाईन शॉप , बिअर शॉपी बंद असल्याने अनेक मद्यपींना ही दुकाने कधी सुरु होणार याबाबत चिंता लागली होती . येथील वाईन शॉपी मालकाला परवानगी उशीरा मिळाली .वाईन आल्यानंतर अनेकांनी दुचाकीवरून दारूच्या बाटल्या खोक्यांमध्ये भरुन नेल्या .दुकानांसमोर बॅरिकेट बसविले , एकल रांगा तयार होतील अशी व्यवस्था केली . किरकोळ मद्यविक्री दुकानांतुन केवळ सीलबंद दारुचीच विक्री करण्यात आली . दारू दुकानात दारू पिता येणार नाही . परिसरात थुंकता येणार नाही . सोशल डिस्टन्सिंगचे पालन होते अथवा नाही हे पाहण्यासाठी पोलीस येऊ शकतात म्हणून मालकाने त्रास होऊ नये म्हणून आधिकारी , कर्मचाऱ्यांची रात्रीची व्यवस्था करुन ठेवली . 

रात्री रंगल्या पाटर्या .
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जशा थर्टी फर्स्ट चे आयोजन होते तसेच आयोजन पाहायला मिळाले . तळीरामांची शेतीवाडयावर कोणाचा त्रास नाही अशा ठिकाणी मद्य पियांचा पाटर्या रंगल्या .एरंवी वाईन शॉपी जवळच एका मटन हॉटेल्समध्ये किचन रात्रभर सुरू होते .पार्सल बनवून बाहेर घेऊन जात होते . सकाळी अनेक ठिकाणी फुटलेल्या बाटल्याही आढळल्या .
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com