esakal | चोरांपासून सावधान..! धुळे पोलिसांतर्फे जागृती
sakal

बोलून बातमी शोधा

 Police

चोरांपासून सावधान..! धुळे पोलिसांतर्फे जागृती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी घरफोड्या, चोऱ्यांचे सत्र (Theft) वाढले आहे. त्यामुळे नागरिक हवालदिल आहेत. असे असताना गणेशोत्सवात (Ganesh utsave) नागरिक आरती, पूजनासाठी काही प्रमाणात संघटित होत असल्याने येथील पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याने (Dewpur Police) चोरांपासून सावधान या विषयावर जनजागृती (Awareness) व प्रबोधनपर उपक्रम हाती घेतला आहे.

हेही वाचा: पांझरा नदीलगत नाल्यात विषारी रसायन..गावकऱ्यांमध्ये भिती


भरदिवसा आणि रात्रीची चोरी, घरफोड्यांचा सपाटा सुरू आहे. काही भागात महापालिकेचे पथदीप नाहीत, काही ठिकाणी नागरिक रात्री दिवे सुरू ठेवत नाहीत, बाहेरगावी जाताना शेजारी किंवा जवळच्या पोलिस ठाण्यास माहिती देत नाहीत, घरी एखाद्या व्यक्तीस मुक्कामी ठेवत नाहीत अशा विविध कारणांमुळे चोरटे संधी साधत हातसफाई करतात. दिवसा ते रेकी करून चोरीची संधी साधतात, शिवाय यंत्रणेत मनुष्यबळाची कमतरता हा पोलिसांचा युक्तिवाद असतो. याउलट नागरिकांना पथदीपांसह विविध सोयीसुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी होतात. यात चोरटे संधी साधतात.

हेही वाचा: रोजगार सेवकांच्या मागणीला 'लिंबुपाण्या'चा गोडवा


असे असताना गणेशोत्सवाची संधी साधत पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक योगेश राजगुरू यांनी चोरी, घरफोड्यांच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी जनजागृती, प्रबोधनाचा उपक्रम हाती घेतला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने ते पश्‍चिम देवपूर ठाणे हद्दीत रात्रीची गस्त वाढवीत आहेत. शिवाय पोलिस उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या उपस्थितीत संकल्प कॉलनी, झेंडा चौक, विघ्नहर्ता कॉलनी, अयोध्यानगर, दोंदे कॉलनी, बिजलीनगर, नकाणे रोड, इंदिरा गार्डन, भरतनगर, केले कॉम्प्लेक्स आदी ठिकाणी पोलिसांनी चोरांपासून सावधान या विषयावर जनजागृतीपर फलक लावले जात आहेत. तसेच रहिवाशांच्या बैठका घेत त्यांना मालमत्तेचे संरक्षण व दक्षता कशा प्रकारे घ्यावी याबाबत मार्गदर्शन करत आहेत. श्री. पिंगळे, श्री. राजगुरू, उपनिरीक्षक एम. एच. सय्यद, हवालदार मुक्तार शेख, किरण कोठावदे, परशुराम पवार, रमाकांत पवार, सुनील राठोड, सुधीर शिरसाळे आदी नागरिकांचे प्रबोधन करत आहेत.

loading image
go to top