esakal | धुळ्यात माजी नगरसेवकासह पत्नीविरोधात खंडणीचा गुन्हा 
sakal

बोलून बातमी शोधा

धुळ्यात माजी नगरसेवकासह पत्नीविरोधात खंडणीचा गुन्हा 

आम्ही धुळ्यातील मोठे गुंड आहोत, माझ्यावर पूर्वी खुनाचा गुन्हा दाखल झाल्याचे सांगत फिर्यादीकडे खंडणी मागितली

धुळ्यात माजी नगरसेवकासह पत्नीविरोधात खंडणीचा गुन्हा 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

चिमठाणे ः आच्छी (ता. शिंदखेडा) येथील तापी नदीवरील चार वर्षांपूर्वीच्या वाळूघाटातील आर्थिक व्यवहारातून शिंदखेडा पोलिस ठाण्यात धुळ्याचे माजी नगरसेवक तुषार पाटील व त्यांची पत्नी नीलिमा यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला. 

वाचा- अरेच्च्चा शेतात पिक नव्हे तर वाळू, महसुल प्रशासनाची कारवाई

संशयित धुळ्याच्या पाटील दांपत्याने दोन कोटी ४८ लाख रुपयांची खंडणी मागितल्याची फिर्याद हिसपूर येथील सरपंच, तसेच चिलाणे (ता. शिंदखेडा) शिवारातील धनदाई पेट्रोलपंपाच्या मालक दीपमाला भिकनराव पाटील यांनी दिली. धनवाशी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील प्रताप हरी पाटील यांनी चार वर्षांपूर्वी अच्छी येथे वाळूचा घाट घेतला. तेथे तुषार प्रतापराव पाटील (रा. धनाई-पुनाई कॉलनी, धुळे) नेहमी आच्छी येथे येत होते. त्यामुळे त्यांच्याशी भिकनराव पाटील यांची ओळख झाली. पाटीलद्वयींमध्ये घरोबा वाढला.

आम्ही धुळ्यातील मोठे गुंड

फिर्यादी ८ नोव्हेंबरला घरी असताना संशयित तुषार व नीलिमा पाटील यांनी आम्ही धुळ्यातील मोठे गुंड आहोत, माझ्यावर पूर्वी खुनाचा गुन्हा दाखल झाल्याचे सांगत फिर्यादीकडे खंडणी मागितली. पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सी. जी. नागरे तपास करीत आहेत. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे