esakal | पांझरा-कान पुनर्जिवित होणार; उपमुख्यमंत्री अजीत पवारांनी दिले आश्वावसन  
sakal

बोलून बातमी शोधा

पांझरा-कान पुनर्जिवित होणार; उपमुख्यमंत्री अजीत पवारांनी दिले आश्वावसन  

पांझरा कान सहकारी साखर कारखान्याचे तेरा वेळेस आत्तापर्यंत निविदा निघाली निघाली. मात्र ती रद्द झाली. या कारखान्याची १२५० मेट्रिक टन प्रतीदिन उसाचे गाळप करण्याची क्षमता आहे.

पांझरा-कान पुनर्जिवित होणार; उपमुख्यमंत्री अजीत पवारांनी दिले आश्वावसन  

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : साक्री तालुक्यातील शेतकरी कामगार बेरोजगारांसाठी जिव्हाळ्याचा विषय असलेला पांझरा- कान साखर कारखाना गेल्या अठरा वर्षांपासून बंद आहे. पांझरा कान सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देऊन पुनर्जीवित करण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी पांझरा कान पुनर्जीवित करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल़ असे आश्‍वासन दिले. 

वाचा- खोक्‍यावर झाडू भरलेल्या गोण्या; त्‍याखाली होते वीस लाखाचे घबाड
 

राज्यातील बंद पडलेल्या साखर कारखान्यांना पुनर्जीवित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीसमोर पांझरा कानचा प्रस्ताव सादर करून भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी देऊन सहकार्य करणार असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले. पांझरा कान सहकारी साखर कारखान्याचे तेरा वेळेस आत्तापर्यंत निविदा निघाली निघाली. मात्र ती रद्द झाली. या कारखान्याची १२५० मेट्रिक टन प्रतीदिन उसाचे गाळप करण्याची क्षमता आहे. पाच लाख मेट्रिक टनपर्यंत ही क्षमता जाऊ शकते. शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी प्रोत्साहन दिले तर, साडेसात लाख मेट्रिक टन उसाचे गाळप देखील होऊ शकते.

क्लिक करा-  लाकडाची तस्‍करी करणाऱ्या संशयिताच्‍या घरावर वनविभागाच्या पथकाची कारवाई 
 

राज्यशासनाचे दोन वेळा या कारखान्यास पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सुरवातीला साक्री तालुक्यातील जामखेडी, मालनगांव, लाटीपाडा ही धरणे धुळे शहरात शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित होते़. मात्र, अक्कलपाडा धरण झाल्यानंतर धुळे शहराचा पाणी प्रश्‍न निकाली निघाला आहे़. त्यामुळे या तिन्ही धरणाचे पाणी साक्री तालुक्यात सिंचनासाठी उपलब्ध होऊ शकतो़. 
 
संपादन- भूषण श्रीखंडे