esakal | धुळ्यातील लाटीपाडा, मालनगाव, जामखेली प्रकल्प ओव्‍हरफ्लो
sakal

बोलून बातमी शोधा

Dam

धुळ्यातील लाटीपाडा, मालनगाव, जामखेली प्रकल्प ओव्‍हरफ्लो

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


साक्री : तालुक्यातील लाटीपाडा, मालनगाव व जामखेली हे तिन्ही मध्यम प्रकल्प (Dam) पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो (Overflow)झाले आहेत. सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग होत आहे. काहीशा उशिराने परंतु समाधानकारक आलेल्या पावसामुळे (Rain) पाण्याची चिंता मिटली असून यामुळे शेतकऱ्यांसह (Farmers) सर्वसामान्यांमध्ये समाधान आहे.

हेही वाचा: धुळ्यात ६३ किलो चांदीची गणेशमूर्ती; लसीकरणाची जागृती


यंदा सुरुवातीच्या काळात पावसाने पाठ फिरवल्याने पाऊस होतो की नाही याबाबत धाकधूक वाढली होती. ऑगस्ट महिना अखेरीपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्याने सर्वांची चिंता वाढली होती. मात्र सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच दमदार पावसाने पुनरागमन केल्याने सर्वत्र नदी नाले वाहू लागले. प्रकल्प देखील भरू लागले. यात तालुक्यातील तीन महत्त्वाचे मध्यम प्रकल्प असणारे लाटीपाडा, मालनगाव व जामखेली हे तिन्ही प्रकल्प शंभर टक्के पूर्ण भरून ओव्हरफ्लो झाले असून यामुळे नद्या देखील प्रवाहित झाल्याने पाण्याची चिंता मिटली आहे. यासोबतच विरखेल व बुरुडखे हे लघू प्रकल्प देखील १०० टक्के भरले असून अन्य लघू प्रकल्प देखील पूर्ण भरण्याच्या मार्गावर असल्याने पाण्याची चिंता दूर होणार आहे. दरम्यान लाटीपाडा व मालनगाव हे महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण भरून पांझरा व कान या नद्या प्रवाहित झाल्याने पुढे असणारे अक्कलपाडा हे धरणे देखील भरण्यास मदत होणार असून यातून धुळे तालुक्यासह शहराला व या भागातील नदीकिनारी असणाऱ्या गावांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा: दारू विक्रेत्यांशी वाद..रेल्वेखाली झोकून तरुणाची आत्महत्त्या


४७१ मिलिमीटर पावसाची नोंद
तालुक्यात १५ सप्टेंबर अखेरीस दहा मंडळांमध्ये मिळून सरासरी ४७१.३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून गेल्या वर्षाच्या तुलनेत ही आकडेवारी कमी असली तरी काहीअंशी समाधानकारक आहे. यात आत्तापर्यंत झालेल्या पावसामध्ये (आकडे मिलिमीटर मध्ये) साक्री मंडळ (५२८), कासारे (३९९), निजामपुर (४२०), दुसाने (४२१), म्हसदी प्र.नेर (३९३), पिंपळनेर (२३७), ब्राह्मणवेल (४०७), कुडाशी (६८१), उमरपाटा (६७७) तर दहिवेल ४०१ अशी पावसाची नोंद झाली आहे.

loading image
go to top