esakal | धुळ्यात ६३ किलो चांदीची गणेशमूर्ती; लसीकरणाची जागृती
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Silver idol

स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी पुण्यात गणेशोत्सव सुरू केला. त्यानंतर वर्षाने शहरातील श्रीमंत स्वतंत्र भांग्या मारुती गणेश मंडळातर्फे गणेशोत्सव सुरू झाला.

धुळ्यात ६३ किलो चांदीची गणेशमूर्ती; लसीकरणाची जागृती

sakal_logo
By
निखील सुर्यवंशीधुळे : शहरातील गल्ली क्रमांक सहामध्ये श्रीमंत स्वतंत्र भांग्या मारुती गणेश मंडळातर्फे (Bhangya Maruti Ganesh Mandal) स्वातंत्र्यपूर्व काळापासून गणेशोत्सव (Ganesh Utsav) साजरा होत आहे. या मंडळातर्फे दर वर्षी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. पूर्वी गणेशोत्सवासाठी थेट पेण येथून गणेशमूर्ती आणली जात. मात्र, त्यासाठी लागणारा खर्च आणि इतर अडचणींचा विचार करत गणेश मंडळाने चांदीची मूर्ती (Silver idol) तयार करण्याचा निर्णय घेतला. गणेशोत्सवानिमित्त व्यायामशाळेत ६३ किलो चांदीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना झाली आहे. मंडळातर्फे यंदा कोरोना (Corona) प्रतिबंधक लसीकरणासाठी (Vaccination) नागरिकांना प्रवृत्त करण्यावर भर दिला जात आहे.

हेही वाचा: अभियंता दिन विशेष:दोन दशकांपूर्वी ठरले‘मेक इन इंडिया’चे पायोनिअर

स्वतंत्र भांग्या मारुती व्यायामशाळा रामभाऊ करनकाळ यांनी स्थापन केली. त्यांचे हे कार्य किसनराव करनकाळ यांनी पुढे नेले. त्यांच्यानंतर आता शहराचे माजी महापौर भगवान करनकाळ व्यायामशाळेचे व्यवस्थापन सांभाळत आहेत. या माध्यमातून विविध वार्षिक सण, उत्सव साजरे होतात. त्यात दहीहंडी, शिवजयंती, होळी आदींचा समावेश आहे. यात लोकसहभागातून तब्बल ६३ किलो चांदीची गणेशमूर्ती तयार केली. नाशिक येथील कारागिरांनी तीन वर्षांत ही मूर्ती साकारली आहे. तसेच २००० पासून याच चांदीच्या मूर्तीची गणेशोत्सवात प्रतिष्ठापना होते. दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे साध्या पद्धतीने भांग्या मारुती व्यायामशाळेत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जात आहे. जलप्रदूषण टाळण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती टाळावी, असे आवाहन पाच वर्षांपासून होते आहे. मात्र, श्रीमंत स्वतंत्र भांग्या मारुती मंडळातर्फे चांदीची मूर्ती स्थापना करून २१ वर्षांपूर्वीच पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.


स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी पुण्यात गणेशोत्सव सुरू केला. त्यानंतर वर्षाने शहरातील श्रीमंत स्वतंत्र भांग्या मारुती गणेश मंडळातर्फे गणेशोत्सव सुरू झाला. ही परंपरा आजही अविरत सुरू आहे. या मंडळातर्फे कॅन्सर निदान शिबिर, मोतीबिंदू शिबिर, रक्तदान शिबिर, गरजूंना धान्यवाटप, किराणावाटप, भांडेवाटप केले जाते. गणेशोत्सव कालावधीत विविध विषयांवर प्रबोधन केले जाते. त्यात अंधश्रद्धा निर्मूलन, बेटी बचाव बेटी पढाव, स्त्रीभ्रूणहत्या रोखणे, पर्यावरण संवर्धन, प्लॅस्टिक बंदी, दहशतवाद आदींचा अंतर्भाव आहे.

हेही वाचा: चोरांपासून सावधान..! धुळे पोलिसांतर्फे जागृती

गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटकाळात जनजागृती करण्यात आली. यंदाही साध्या पद्धतीने गणेशोत्सव होत आहे. सामाजिक बांधिलकीतून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत जनजागृती केली जात आहे.
-भगवान करनकाळ, अध्यक्ष,
श्रीमंत स्वतंत्र भांग्या मारुती गणेश मंडळ, धुळे

loading image
go to top