esakal | बंद शाळेने पटांगणात काटेरी गवताचे आच्छादन
sakal

बोलून बातमी शोधा

dhule zp school

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे सहा महिन्यांपासून शाळा बंद आहेत. शाळा खोल्यांसह इमारती धुळखात पडून आहेत. सातत्यपुर्ण पावसामुळे पटांगणावर काटेरी झाडे आणि गवताचा वेढा पडला आहे. घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

बंद शाळेने पटांगणात काटेरी गवताचे आच्छादन

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे (धुळे) : जिल्ह्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. सततच्या पावसाने शहरीसह ग्रामीण जिवनही विस्कळीत झाले आहे. सर्वत्र डबके, चिखल आणि काटेरी गवातांचे साम्राज्य वाढले आहे. कोरोनाचा प्रादुर्भावामुळे बंद असल्‍याने शाळांच्या पटांगणांना काटेरी वृक्षांनी वेढलेले आणि काटेरी गवताने आच्छादन वाढविले आहे. पटांगणाची साफसफाई करण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून होवू लागली आहे. तर मुबलक पाऊस होवूनही वृक्षारोपणाकडे शाळा महाविद्यालयांनी दुर्लक्ष केल्याचे पुढे आले आहे.

सहा महिन्यांपासून शाळा बंद
कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे सहा महिन्यांपासून शाळा बंद आहेत. शाळा खोल्यांसह इमारती धुळखात पडून आहेत. सातत्यपुर्ण पावसामुळे पटांगणावर काटेरी झाडे आणि गवताचा वेढा पडला आहे. घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शिक्षकांची साखळी हजेरी सुरु आहे. मात्र स्वच्छतेकडे लक्ष नसल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील जिल्हा परीषद, नगरपालिका व खासगी संस्थांच्या शाळांची साफसफाई व्हावी. पटांगणाची स्वच्छता होण्याची मागणीवजा अपेक्षा पालकांमधून व्यक्त होत आहे.

तरीही वृक्षारोपणाकडे दुर्लक्ष ...
दरवर्षी वृक्षारोपनाचा शाळा महाविद्यालयांकडून मोठा गाजावाजा व्हायचा. यावर्षी मुबलक पाऊस असूनही वृक्षारोपनाकडे दुर्लक्ष झाल्याचे पुढे आले आहे. साखळी पध्दतीने शाळेत हजेरी लावणाऱ्या शिक्षकांनी वृक्षारोपण करण्यासाठी सेवाभावी संस्थेचा मदत घ्यावी. वृक्षारोपणाचा टक्का वाढविण्याचेही चर्चिले जात आहे.

सुटीत फुलविली शाळा
जिल्ह्यात काही शिक्षकांनी सततच्या पावसाचा आणि सुटीचा चांगला उपयोग करुन घेतला आहे. त्यांनी शाळा परीसरमध्ये परसबाग व बगीचाही फुलविला आहे. यात निकुंभे, धनूर, कापडणे आदी शाळांचा समावेश आहे.

...हो काही शिक्षक बांधावर
लॉकडाऊन सुटीचा काही शिक्षकांनी शेतीसाठी चांगलाच उपयोग करुन घेतला आहे. ते शेतीत राबतांना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या कल्पकतेने शेती फुलविली आहे. चार महिन्यांपासून नियमित  बांधावर दिसणार्‍या शिक्षकांना बघून ग्रामस्थ गुरूजी तुम्हीपण असे म्हणू लागले आहेत.

संपादन ः राजेश सोनवणे

loading image
go to top