esakal | पोलीस आले छापा देखील मारला पण खालीहात परतावे लागले !  
sakal

बोलून बातमी शोधा

पोलीस आले छापा देखील मारला पण खालीहात परतावे लागले !  

दोंडाईचा बसस्थानक शेजारी हाकेच्या अंतरावर माखीजा कॉम्पलेक्सच्या भिंत्तीलगत काही इसम हातभट्टीची दारु तयार करुन तेथेच विक्री करतात हे पूर्ण शहरातील जनता जानून आहे.

पोलीस आले छापा देखील मारला पण खालीहात परतावे लागले !  

sakal_logo
By
रणजित राजपूत

दोंडाईचा : दोंडाईचा शहरात रहदारीच्या रस्त्यावर बसस्थानकापासुन हाकेच्या अंतरावर हातभट्टीची दारू तयार करुन खूत्लेआम विक्री होते, येथे पोलीसांनी पिंजरागाडीसह छापा टाकला आणि पोलीस हातचोळत परतले, कसे ? याचेच जनतेतून आश्चर्य व्यक्त होत आहे.


दोंडाईचा बसस्थानक शेजारी हाकेच्या अंतरावर माखीजा कॉम्पलेक्सच्या भिंत्तीलगत काही इसम हातभट्टीची दारु तयार करुन तेथेच विक्री करतात हे पूर्ण शहरातील जनता जानून आहे,तरी पोलीसअधिकारी व कर्मचारी याकडे दूर्लक्ष करतात कसे ? असा प्रश्न जनतेला सतावतो,पण कारवाई होत नाही,

 एस,पीं, चा दौऱ्याची शक्यता दोडांईचा भागात पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीताच्या दौऱ्याची शक्यता लक्षात घेऊन या रस्त्याने त्यांची गाडी आली,आणि त्यांच्या नजरेत येथील खूत्रुलेआम विक्री होणारी दारु पडली तर आमची खैरनाही ,अशा भितीपोटी काही पोलीस अधिकाऱ्यानी आरोपी घेऊन जाणाऱ्या पिंजरागाडीवर येऊन नाममात्र छापा टाकून खालीहात चोळत परतले आणि दारुविकणाऱ्यानां वरीष्ठसाहेबांचा दौरा असल्याचे सांगुन ,विक्री बंद ठेवा अशी तंबी दिली,सांयकाळ पर्यंत याबाबत पोलीसात नोंद नव्हती,यामूळे पोलीसांच्या भुमिकेविषयी जनतेत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
 

संपादन- भूषण श्रीखंडे