"ती' दवाखान्याकडे निघाली अन्‌  रुग्णवाहिकेतच तिळ्यांना जन्म 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

नाशिक : मुकणे (ता. इगतपुरी) येथील गर्भवतीला प्रसूती कळा सुरू झाल्याने तिला वाडीवऱ्हेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जाण्यासाठी बोलाविलेल्या 108 रुग्णवाहिकेतच तीन गोंडस मुलींना जन्म दिला. तिळ्यांना जन्म दिल्याने प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळ-बाळंतीण सुखरूप असल्याने कुटुंबीयांसह डॉक्‍टरांचाही जीव भांड्यात पडला. 

अनिता हिलम (रा. मुकणे, ता. इगतपुरी) असे मातेचे नाव आहे. अनिता यांना सोमवारी (ता. 2) सकाळी प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यामुळे तत्काळ आशासेविका शारदा नारायण उबाळे यांना कळविण्यात आले असता, त्या मदतीसाठी त्यांच्या घरी पोचल्या. त्यांनी पोचताच तत्काळ 108 रुग्णवाहिकेला संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानुसार वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे असलेल्या 108 रुग्णवाहिकेचे चालक युवराज राजापुरे व डॉ. शाहीद खान यांच्यासह काही मिनिटांत मुकणे येथे पोचले. गर्भवती अनिता आणि नातेवाइकांना रुग्णवाहिकेत घेऊन चालक राजापुरे याने रुग्णवाहिका वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिशेने निघले. 

नक्की वचा- निवृत्तीनाथ देवस्थान ट्रस्टच्या जमीनीचा वाद

प्रसववेदना तीव्र आणि तिळ्यांना दिला जन्म

अनिता यांना प्रसूती वेदना तीव्र झाल्याचे डॉ. खान यांनी वैद्यकीय कौशल्य वापरत आशासेविका उबाळे व महिला नातेवाइकांच्या मदतीने गर्भवतीची रुग्णवाहिकेतच प्रसूती केली. मातेने प्रारंभी जुळ्या मुलींना जन्म दिला. त्यानंतर काही मिनिटांत तिसऱ्या मुलीलाही जन्म दिला. मातेसह नवजात तिघा शिशूंना वाडीवऱ्हे केंद्रात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी नाशिकला जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात मातेसह तिघा शिशूंवर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले. या वेळी मातेच्या नातलगांनी 108 रुग्णवाहिकेचे डॉ. खान, चालक राजापुरे आणि आशासेविका उबाळे यांचे आभार मानले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news female delivery in nashik