इगतपुरीच्या महात्मा गांधी हायस्कूलमधे सूर्यनमस्काराचा जागतिक विक्रम

विजय पगारे
बुधवार, 24 जानेवारी 2018

इगतपुरी : शहरातील महात्मा गांधी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तसेच नूतन मराठी शाळा व सिनियर कॉलेज येथील 1 हजार 704 विद्यार्थ्यांनी 24 जानेवारीला 'सूर्यनमस्कार एक अविष्कार' हा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक ही शैक्षणिक संस्था 2017-18 हे वर्ष शतक महोत्सव साजरा करत आहे. 

इगतपुरी : शहरातील महात्मा गांधी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तसेच नूतन मराठी शाळा व सिनियर कॉलेज येथील 1 हजार 704 विद्यार्थ्यांनी 24 जानेवारीला 'सूर्यनमस्कार एक अविष्कार' हा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक ही शैक्षणिक संस्था 2017-18 हे वर्ष शतक महोत्सव साजरा करत आहे. 

शतक महोत्सवाचे औचित्य साधून संस्थेमार्फत अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे 'सूर्यनमस्कार एक अविष्कार'. विद्यार्थ्यांमधे व्यायामाची आवड निर्माण व्हावी हा उद्देश समोर ठेवून संस्थेच्या विद्यार्थ्यांकडून सामूहिकरित्या एक कोटी सूर्यनमस्कार घालण्याच्या उपक्रमाची मागील वर्षी रथसप्तमीला सुरुवात करण्यात आली होती. 24 जानेवारीला जागतिक विक्रम नोंदवित या अभूतपूर्व उपक्रमाचा समारोप संस्थेच्या विविध संकुलात मोठ्या उत्साहात पार पडला.

संस्थेच्या इगतपुरी संकुलातील महात्मा गांधी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तसेच नूतन मराठी शाळा येथील 1 हजार 704 विद्यार्थी रेल्वे मैदानावर सामूहिकरित्या सूर्यनमस्कार घालून एक वर्षात 1 कोटी 45 लाख 94 हजार 786  सूर्यनमस्कार घालण्याच्या जागतिक विक्रमाची नोंद करण्यात आली. या भव्य सोहळ्यासाठी गीनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी, लिम्का बुक वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी संतोष हुदलिकर, कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणून इगतपुरी संकुल प्रमुख मधुकर जगताप अशोकशेठ नावंदर, प्रमुख पाहुणे म्हणून विद्या देशपांडे, योग शिक्षक सुजाता दराडे महात्मा गांधी हायस्कूलचे प्राचार्य अरुण गायकवाड़ शांता तुसे, प्रतिभा हिरे विद्यमान नगरसेवक गावातील प्रतिष्ठित नागरिक आदि उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी संकुलातील प्रमुख म्हणून प्रसाद चौधरी व कांतिलाल राठोड यांनी विशेष जबाबदारी पार पाडली. या नाविन्यपूर्ण उपक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड मधे घेण्यात येऊन त्याचे प्रमाणपत्र प्राचार्य अरुण गायकवाड सर यांना प्रदान करण्यात आल्याने इगतपुरी शहर परिसरातील विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी आनंद व्यक्त केला कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, उपमुख्याध्यापक दयाराम आहिरे पर्यवेक्षक दिलीप आहिरे, विजय सोनवणे संदीप सरोदे, रवींद्र आसवले आदि शिक्षकांनी प्रयत्न केले.

 

Web Title: Marathi news igatpuri news yoga and suryanamskar