एका वर्षाच्या चिमुकलीसह दोन जणांना कोरोनाची लागण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 मे 2020

आज जिल्ह्याभरातील स्वॅब घेतलेल्या 158 कोरोना संशयित रुग्णांचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यामधील 155 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले​

जळगाव: जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यात आज तीन कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले. यामध्ये एका वर्षाच्या चिमुकलीसह इतर दोन जणांचा समावेश आहे. यातील एक जण कोव्हीड रुग्णालयातील कर्मचारी असल्याने आता कर्मचाऱ्यांना देखील लागण होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरलेले आहे. 

आर्वजून पहा : भाजपचा फौजफाटा खडसेंना घेरण्याच्या तयारीत ! 
 

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता चांगलीच वाढलेली आहे. दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून नागरिकांमध्ये देखील भितीचे वातावरण पसलेले आहे. यात आज जिल्ह्याभरातील स्वॅब घेतलेल्या 158 कोरोना संशयित रुग्णांचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यामधील 155 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून तीन जणांचे अहवाल पॉझिटव्ह आले आहे. 

आक्‍सानगरातील दोघ रुग्ण एकाच कुटूंबातील 
मेहरुण परिसरातील आक्‍सानगरातील दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. या दोघांना त्यांच्या कुटूंबातील एका व्यक्तीपासून संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये एका वर्षाच्या चिमुकलीसह 33 वर्षीय महिलेचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या कुटूंबातील 55 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्या महिलेच्या संपर्कात आल्यामुळे कुटूंबातील इतर दोघांना लागण झाली आहे. 

नक्की वाचा : रस्त्यावरील बेशिस्त फळ-भाजी बाजार होणार बंद ! 
 

कोव्हीड रुग्णालयातील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण 
श्रीधरनगरातील पॉझिटिव्ह आलेल्या 60 वर्षीय प्रौढाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. हे प्रौढ जिल्हा शासकीय महाविद्यालयात (कोव्हीड) रुग्णालयातीलच कर्मचारी असून त्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon agin three corona patients report positive