"लॉकडाउन'मध्ये मद्य तस्करी...दुकानानंतर गुदामाचा परवानाही रद्द ! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 एप्रिल 2020

गुदाम "मे. क्रिश ट्रेडर्स'चा परवानाही त्यांनी कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश पारीत केले. "मे. क्रिश ट्रेडर्स'मध्ये अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या पत्नी अनिता चौधरी भागीदार असल्याचेही समोर आले आहे. 

जळगाव : "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर देशासह राज्यभरात करण्यात आलेल्या "लॉकडाउन'च्या काळात जिल्ह्यातील सर्व मद्य विक्रेत्यांची दुकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने "सील' केले असताना येथील अजिंठा चौकानजीकच्या "आर.के.वाइन्स' या दुकानातून विदेशी मद्याची तस्करी गुन्हे शाखेने उघडकीस आणली. यासंदर्भात गुन्हा दाखल होऊन चौकशीअंती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी "आर.के.वाइन्स'चा परवाना कायमस्वरूपी रद्द केला. अतिरिक्त चौकशीअंती मालक राजकुमार नोतवाणी यांच्याच मालकीचे नशिराबाद येथील गुदाम "मे. क्रिश ट्रेडर्स'चा परवानाही त्यांनी कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश पारीत केले. "मे. क्रिश ट्रेडर्स'मध्ये अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या पत्नी अनिता चौधरी भागीदार असल्याचेही समोर आले आहे. 

नक्की वाचा :  जळगावात आणखी दोन कोरोना पॉझिटीव्ह 
 

राजकुमार नोतवाणी यांच्या मालकीच्या "आर.के.वाइन्स'चा परवाना रद्द (18 एप्रिल) झाल्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने काल दुकानातील सर्व माल आपल्या ताब्यात घेतला असून, कार्यालयाचे गुदाम "सील' केले आहे. नोतवाणी यांच्याच मालकीचे नशिराबाद-सुनसगाव रोडवरील "मे. क्रिश ट्रेडर्स' (एफएल-1, अनुज्ञाप्ती क्र. 12) नावाने गुदाम असून, रविवारी (12 एप्रिल) गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला त्यावेळी नितीन श्‍यामराव महाजन (अयोध्यानगर), नरेंद्र अशोक भावसार (अजिंठा चौक), दिनेश अशोक नोतवाणी आणि मॅनेजर गणेश कासार यांना ताब्यात घेतले. त्यांनी घटनेवेळी मध्यरात्रीनंतर सुरवातीला कारमध्ये (एमएच 18- डब्ल्यू 9842) अगोदर नशिराबादच्या याच गुदामातून माल भरला होता. त्यानंतर अजिंठा चौकानजीकच्या दुकानात येऊन इतर माल पुन्हा कारमध्ये भरताना पोलिसांनी पकडले. परिणामी दुकानासह नशिराबाद येथील गुदामाची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी करून त्यातील नोंदींत तफावत आढळून आली. त्यासह आलेला माल विनावाहतूक परवाना आलेला होता. दुकानापेक्षा गुदामात अतिरिक्त साठा आढळून आल्याने या प्रकरणाचा अहवाल राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी तयार करून महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 56 (1) (ब) अन्वये प्राप्त अधिकारानुसार त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश आज पारीत केले. 

आर्वजून पहा :  कोरोना संशयीत तरुणीने स्वॅब घेण्यापूर्वी ठोकली धूम 

काय आहे आदेशात? 
"लॉकडाउन'च्या काळात अनुज्ञाप्तीधारक राजकुमार शीतलदास नोतवाणी व भागीदार अनिता शिरीष चौधरी यांच्याकडून जिल्हाधिकारी, जळगाव यांचे आदेश क्रमांक सीएलआर/एफएलआर-112020/आव्य/ दिनांक 21 व 31 मार्च 2020, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005, भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188, मुंबई विदेशी मद्द नियम, 1953 चे नियम 10 (1) (ब), 15, 16, 21 (3) (ब), 21 (5) 22 तसेच एफएल-1 अनुज्ञाप्ती शर्त क्रमांक 2 व 7, महाराष्ट्र विदेशी मद्य (रोखीने विक्री व विक्रीच्या नोंदवह्या इत्यादी) नियम 1969 चे नियम 9 व 14 (1) या नियमांचा भंग केला. 

क्‍लिक कराः तीन वर्षाच्या चिमुकलीचा काय दोष...त्याची वाईट नजर पडलीच 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Alcohol smuggling in lockdown warehouse license canceled after shop!