जिल्ह्यात अजून 14 पॉझिटिव्ह...सर्व कोरोनाबाधीत रुग्ण अमळनेर मधील 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 मे 2020

अमळनेर येथील परिस्थिती कशी नियंत्रणात आणावी याचे आवाहन प्रशासनापुढे निर्माण झाले आहे. 

जळगाव ः जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या गुरुवारी रात्री शंभरावर गेली. आज सकाळी अमळनेरमधील स्वॅब घेतलेल्या 78 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल नुकताच प्राप्त झाला. यापैकी 64 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले. तर चौदा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. 

नक्की वाचा : जळगावने गाठली शंभरी; नवे दहा कोरोना बाधित 
 

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 114 इतकी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाबत परिस्थिती चिंताजनक झाली आहे. त्यात एकट्या अमळनेर मधील संख्या सत्तरच्या आसपास झाली आहे. त्यानंतर पाचोरा व भुसावळ शहरात कोरोना बाधितांचे संख्या अधिक आहे. त्यामुळे अमळनेर येथील परिस्थिती कशी नियंत्रणात आणावी याचे आवाहन प्रशासनापुढे निर्माण झाले आहे. 

आर्वजून पहा : नऊ महिन्याची गरोदर...341 किमीची पायपीट अन्‌ रस्त्यावर न पाहवणारे दृश्‍य ​
 

अमळनेरात सोळा रुग्णांचा मृत्यू 
कोरोना बाधित रुग्णांचा संख्या अमळनेरमध्ये जास्त असून तेथे आतापर्यंत सोळा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 

क्‍लिक कराःफौजदाराच्या पत्नीची डोक्‍यात गोळी झाडून आत्महत्या ;गडचिरोलीतील घटना ; कौटुंबिक वाद विकोपाला 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon amalner corona patients report forteen positive