अंत्ययात्रेदरम्यान लोखंडी पूल कोसळला 

live photo
live photo

जळगाव : शहरातील शनिपेठकडून ममुराबाद रस्त्याने जाणाऱ्या लेंडी नाल्यावरील पादचारी लोखंडी पूल कोसळल्याची घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. अंत्ययात्रा जात असतानाच हा पूल कोसळला, मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. हा पूल जीर्णावस्थेत असतानाही यंत्रणेचे त्याकडे दुर्लक्ष झाले. आज जर मोठी जीवितहानी झाली असती तर जबाबदार कोण? असा संतप्त प्रश्‍न नागरिकांनी केला आहे. 
ममुराबाद मार्गावर लिंगायत-गवळी समाजाची दफनभूमी असून, तिथपर्यंत जाण्यासाठी लोखंडी पूल टाकण्यात आला आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास नारायण अप्पा हिवरे (लिंगायत-गवळी) यांचे निधन झाल्याने त्यांची अंत्ययात्रा पुलावरून जात असताना अचानक पुलाचा एका बाजूकडील भाग खाली नाल्यात कोसळला. त्यामुळे अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांमध्ये चांगलीच धडकी भरली. परिसरातील रहिवाशांनी मदतीस धाव घेतली. अंत्ययात्रेतील तरुणांनी स्वत:सह डोली सुखरूप तोलून धरली, एकेकाने उड्या घेत डोली सुखरूप बाहेर आणली व नंतर पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 
आमदार, गटनेत्यांची घटनास्थळी धाव 
घटनेनंतर आमदार सुरेश भोळे, महापालिकेतील भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याबाबत चौकशी, तसेच याठिकाणी स्वच्छता करण्याच्या सूचना आमदारांनी दिल्या. बाजूलाच पर्यायी पूल असून, मागणी केल्यास तो पूल तयार केला जाईल, असेही भोळेंनी सांगितले. 
 
ही घटना अत्यंत गंभीर आहे. स्वखर्चातून समाजाने पूल बांधला असला तरी परवानगी घेतली होती का? पूल किती जुना होता, बांधकामाची स्थिती कशी होती आदी मुद्यावरून चौकशी केली जाईल. 
- चंद्रकांत डांगे, आयुक्त, मनपा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com