esakal | जिल्हाधिकारी साडेनऊलाच हजर; कर्मचारी मात्र निवांत!

बोलून बातमी शोधा

जिल्हाधिकारी साडेनऊलाच हजर; कर्मचारी मात्र निवांत!

पाच दिवसांचा आठवडा लागू झाल्यानंतर कामाची वेळ बदलविण्यात आली आहे, हे अनेक कर्मचारी, अधिकाऱ्यांना माहीत नव्हते. मात्र, कार्यालयात येताच पाच दिवसांच्या आठवडा व वेळ बदलल्याचे लक्षात येताच हजेरी लवकर लागण्यासाठी कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. 

जिल्हाधिकारी साडेनऊलाच हजर; कर्मचारी मात्र निवांत!
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव ः राज्यातील महाविकास आघाडी शासनाने 29 फेब्रुवारीपासून शासकीय कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा केला. वेळ 9.45 ते 6.15 ठेवली. असे असली तरी  सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्वच शासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांसह कर्मचारी 10 ते 11 या वेळेतच कामावर आलेले दिसले. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे मात्र 9.30 ला कार्यालयात आले. वेळ 9.45 असल्याचे कळताच अनेक कर्मचाऱ्यांनी हजेरी लागण्यासाठी धावपळ केली. 

क्‍लिक कराः महाजनांना धक्का देण्यासाठी राष्ट्रवादीचे हा...तगडा नेता उतरला मैदानात ! 
 

कर्मचाऱ्यांची धांदल 
पाच दिवसांचा आठवडा लागू झाल्यानंतर कामाची वेळ बदलविण्यात आली आहे, हे अनेक कर्मचारी, अधिकाऱ्यांना माहीत नव्हते. मात्र, कार्यालयात येताच पाच दिवसांच्या आठवडा व वेळ बदलल्याचे लक्षात येताच हजेरी लवकर लागण्यासाठी कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. 

..अन कार्यालय गजबजले 
जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई कार्यालयात पोहोचले व कामकाज करताना दिसून आले. त्यानंतर हळूहळू महसूल शाखा, गृह शाखा, टंचाईशाखा, गौण खनिज शाखा, हिशोब शाखा आदी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची सकाळी साडेनऊनंतर येण्यास सुरवात झाली. 

आर्वजून पहा : भुसावळ हादरले; भरदिवसा युवकाचा खून
 

अनेकांचे दहानंतर आगमन 
ज्या कर्मचाऱ्यांना वेळेत बदलाची जाण होती ते पावणेदहापर्यंत आले. मात्र अनेक अधिकारी व कर्मचारी दहानंतरच आले. महसूल शाखा सकाळीच गजबजली. मात्र, कोणी दहा, कोणी सव्वादहा, नायब तहसीलदार 10.20 तर कोणी साडेदहापर्यंत कार्यालयात आल्याचे चित्र पहावयास मिळाले. तर जिल्हा नियोजन अधिकारी 10.55 ला कार्यालयात आले. 

महिला कर्मचाऱ्यांची धावपळ 
आपली वेळेत हजेरी लागावी म्हणून हिशोब शाखेतील महिला कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारातून कार्यालयात प्रांगणात शिरताच वेळेत हजेरी लावण्यासाठी धावपळ केली. 

महापालिकेत 30 "लेटलतीफ' 
जळगाव महापालिकेत पावणेदहाची वेळ असताना तब्बल 30 कर्मचारी उशिरा आले होते. थम्ब मशिन नवीन असल्याने टाइम सेट केलेला नव्हता. मात्र, उपायुक्त अजित मुठे यांनी अहवाल तपासल्यानंतर तीस कर्मचारी दहानंतर आल्याचे आढळून आले. 

नक्की वाचा : भिषण दुर्घटना; सोनगडजवळ तिहेरी अपघातात दहा ठार