महाजनांना धक्का देण्यासाठी राष्ट्रवादीचे हा...तगडा नेता उतरला मैदानात !

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 March 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे संपर्कमंत्र्यांची यादी लवकरच जाहीर होत आहे. त्यात जळगाव जिल्ह्यासाठी संपर्कमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहितीला जिल्हाध्यक्ष ऍड. रविंद्र पाटील यांनी दुजोरा दिला आहे. 

जळगाव : विधानसभा निवडणूकीपूर्वी गिरीश महाजनांनी बारामतीत अजित पवारांना हरवू दाखवू असे वक्तव्य करून थेट पवार कुटुंबाला आव्हान दिले होते. त्यामुळे महाजनांना शह देण्यासाठी शरद पवारांनी राष्ट्रवादीचे तगडा नेता म्हणून जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असा दुजोरा जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय घडामोडीला आता वेग येणार आहे. 

 
नक्की वाचा : गुंजाळीचा तरूणाने फुलविली पडीक जागेत परसबाग 

 

जळगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो, माजी मंत्री एकनाथराव खडसे, गिरीश महाजन हे भाजपचे दिग्गज नेते आहे. अशा स्थितीत देखील एकेकाळी जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तब्बल आठ आमदार होते. परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत पक्षाला मोठा फटका बसला, पक्षाचा केवळ एकच आमदार निवडून आला. त्यामुळे तसेच जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचे गतवैभव पून्हा आणण्यासाठी आता जिल्ह्यात पक्ष बळकट करण्यासाठी पक्षाचे नेते शरद पवारांनी विशेष लक्ष दत आहे. त्यानुसार पक्षाची मुठ पून्हा मजबूत करण्यासाठी त्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी एक दौरा जळगाव जिल्ह्यात केला, आता पुन्हा 9 मार्चला त्यांचा दौरा आहे. या शिवाय खासदार सुप्रिया सुळे यांनीही नुकताच दौरा केला. दोन्ही नेत्यांनी पक्ष कार्यकर्त्यांची बैठक घेवून पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे संपर्कमंत्र्यांची यादी लवकरच जाहीर होत आहे. त्यात जळगाव जिल्ह्यासाठी संपर्कमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहितीला जिल्हाध्यक्ष ऍड. रविंद्र पाटील यांनी दुजोरा दिला आहे. 

आर्वजून पहा : हार्ट ऑफ सिटी लाच पडलाय बेशिस्त वाहतुकीचा विळखा 
 

ताईंची घोषणा..अन्‌ दादांची निवड 
खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीतच जिल्हाला एक दमदार संपर्कमंत्री दिला जाईल अशी घोषणा केली होती. तो कोण आहे हे आपण सांगणार नाही, परंतु जिल्ह्यात एक जोश निर्माण होईल तसेच कार्यकर्त्याची कामे करण्याची उमेद असलेला संपर्कमंत्री दिला जाईल असेही त्यानी स्पष्ट केले 
होते. त्यामुळे जिल्ह्याचा संपर्कमंत्री अजित पवार होणार असल्याने राष्ट्रवादीमध्ये आता उत्साह निर्माण झाला 
आहे. 

क्‍लिक कराः  सुळेंच्या भूमिकेमुळे "राष्ट्रवादी'चीच गोची!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Appointment of Deputy Chief Minister Ajitada Pawar as the liaison minister of the jalgaon district