अरे बापरे...चखणा, तंबाखूसाठी तिच्याकडे तळीराम गेले...आता मात्र ते भयभीत ! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 मे 2020

दाट वस्तीच्या भागात कोरोना रुग्ण आढळला आहे तेथे मात्र कोणतीही कडक सुरक्षा उपायोजना प्रशासनाकडून केली जात नसल्याने अनेक जण मुक्त संचार करत आहे.

जळगाव : शहरातील दाटवस्ती म्हणून ओळख असलेल्या खंडेरावनगरात रविवारी कोरोना बाधीत महिला रुग्ण आढळून आली. त्यामुळे आरोग्य तसेच महापालिका प्रशासन खळबळून जागे झाले आहे. परंतू ही महिला शेव-मुरमूरे विक्री करणारी असल्याने तसेच तिच्या घरासमोर दारुचा अड्डा असल्याने दारू पिणारे चखणा तसेच तंबाखू घेणाऱ्यांची गर्दी असते. त्यामुळे आता या महिलेकडे चखणा व तंबाखू घेण्यासाठी गेलेल्या तळीराम आता भयभीत झालेले आहे. 

क्‍लिक कराः अतिशय गंभीर...कोरोनाबाधित मृतदेहावरील पीपीई किट...फेकले जातात थेट उघड्यावर ! 
 

शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून दाट वस्तीतून आता उच्चभ्रु वस्तीत देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. परंतू ज्या दाट वस्तीच्या भागात कोरोना रुग्ण आढळला आहे तेथे मात्र कोणतीही कडक सुरक्षा उपायोजना प्रशासनाकडून केली जात नसल्याने अनेक जण मुक्त संचार करत आहे. त्यात खंडेराव नगर, हरिविठ्ठल नगरातील भिल वाडा, हरिविठ्ठल नगरच्या मुख्य रस्त्यावरील राजीव गांधी नगर येथे सरास घरांमध्ये दारू विक्री केली जात असल्याने तळीराम दिवसभर तेथे घोंगावत असल्याचे चित्र दिसत आहे. 

संपर्कात आलेल्यांचा शोध लागणार कसा ? 
खंडेराव नगरातील ही कोरोना बाधित महिला रुग्णाच्या घरासमोर हातभट्टी दारु विक्री केली जाते. "पॉझिटिव्ह असलेल्या या व्यक्तीकडे दारु पिणारे चखणा व गायछाप घेण्यासाठी येत होते. त्यामुळे या "पॉझिटिव्ह' रुग्णाने आतापर्यंत खंडेरावनगरात कित्येक जणांना "कोरोना'चे वाटप केली आहे. 

आर्वजून पहा : मातृदिनाला...आईने घेतला अखेरचा श्‍वास..नातवाचे मोबाईलवरुन अंत्यदर्शन !
 

अतिशय दाट वस्ती 
खंडेराव नगरात दाट वस्ती असून लागून लागून घर आहे. त्यामुळे कोरोना बाधीत सापडलेल्या रुग्णाच्या आजूबाजुचे घर, तसेच दारुचा अड्डा तेथे येणारे मद्यपींकडून कोरोना विषांणू किती जणांकडे पसरला असेल 
याचा अंदाज आता मात्र लावणे अशक्‍य आहे. मात्र जे दारू व त्या महिलेकेडे गेले होते ते मात्र आता भयभीत नक्की भयभीत झालेले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona patiant contact purson Frightened