अतिशय गंभीर...कोरोनाबाधित मृतदेहावरील पीपीई किट...फेकले जातात थेट उघड्यावर ! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 मे 2020

कोरोनाग्रस्त रुग्णावरील पीपीई किट काही नागरिकांना स्मशानभुमीत उघड्यावर पडल्याचे दिसून आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

जळगाव ः जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. त्यात 21 जण जिल्हा रुग्णालयातून रविवारी कोरोनातून मुक्त होवून घरी गेल्याचा दिलासा देणारी बाब आहे. परंतू जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यांच्या अंगावरील पीपीई किटची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट न लावता ते स्मशानभूमीतच उघड्यावर फेकून देत असल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे. 

नक्की वाचा :  "आयएमए'चे 250 डॉक्‍टर "कोरोना'त सेवा देणार : अध्यक्ष डॉ.दीपक पाटील 
 

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 175 वर.. 
गेल्या पंधरा दिवसात जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ झाली असून आतापर्यंत 175 आकडेवारी झाली असून जिल्ह्या द्विशतकाकडे वाटचाल सुरू आहे. यात जळगाव शहरासह जिल्ह्यातील अमळनेर, भुसावळ, पाचोरा आणि चोपडा, अडावद येथे सातत्याने कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. 

आर्वजून पहा : Video : पालकमंत्र्यांनी "डीन', "सी.एस.' यांना दिल्या समझोत्याच्या सूचना 
 

मृत्यूची संख्या 22 
कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असताना कोरोनाचा मृत्यूदर देखील अधिक आहे. जळगाव जिल्हा रुग्णालयात एका दिवसाआड कोरोनाचा बळी जात आहे. आतापर्यंत 22 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत कोरोना बाधित रुग्णांचा मृतदेहाची शासकीय निर्देशानुसार विल्हेवाट लावली जाते. त्यासाठी आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, 2 ते 3 कर्मचारी, महसूल आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी यांच्यासह मोजके नातेवाईक यांच्या उपस्थितीत संबंधित मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार होतात. 

पीपीई किट शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करणे आवश्‍यक ? 
कोरोना बाधीत मृतदेह हाताळणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच रुग्णवाहिका चालकांना पीपीई किट परिधान करणे बंधनकारक आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर मृतदेहाच्या अंगावरील पीपीई किटची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे नियमानुसार जाळून टाकणे अथवा खड्डा खोदून त्यात पुरणे बंधनकारक आहे. 

क्‍लिक कराः Video : भुसावळला कोरोनामुक्त रुग्णांचे फुले उधळून स्वागत; दोन डॉक्टरही...
 

आज समोर आला धक्कादायक प्रकार 
जळगावातील नेरीनाका परिसरात असलेल्या स्मशानभूमीत दररोज अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात. यासाठी शेकडो नागरिक याठिकाणी येत असतात. तसेच कोरोनाबाधीत रुग्णांचा देखील येथे अंत्यसंस्कार केला जोतो. याबाबत आज कोरोनाग्रस्त रुग्णावरील पीपीई किट काही नागरिकांना स्मशानभुमीत उघड्यावर पडल्याचे दिसून आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona patients deth body PPE kit thrown to open