मातृदिनाला...आईने घेतला अखेरचा श्‍वास..नातवाचे मोबाईलवरुन अंत्यदर्शन !  

विनोद शिंदे 
Monday, 11 May 2020

आपल्या आईला अखेरचा निरोप देण्याचा प्रसंग आला. त्यामुळे ही घटना मनाला चटका लावून गेली

कुसुंबाः  "मदर्स डे' अर्थात मातृदिनाच्या दिवशी काल सारे जग आपल्या आईप्रती प्रेम आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करत असतांना कुसुंबा (ता. धुळे) येथे मुलांवर आपल्या आईला अखेरचा निरोप देण्याचा प्रसंग ओढवला. शिवाय कोरोनामुळे बाहेर गावावरुन येता न आल्याने नातवाने आपल्या आजीचे मोबाईलवरुनच अंत्यदर्शन घेतले अन्‌ अखेरचा निरोपही दिला. 

आर्वजून पहा : Video : पालकमंत्र्यांनी "डीन', "सी.एस.' यांना दिल्या समझोत्याच्या सूचना 

कुसुंबा येथील वत्सलाबाई भाईदास शिंदे ( ग.नं. दोन) गेल्या पंधरा दिवसापासुन आजारी होत्या. मुलगा संजय शिंदे, विकास शिंदे, मुलगी रेखाबाई शिंदे, सुनंदा शिंदे ,सुन गायत्री शिंदे व मिनाक्षी शिंदे हे त्यांची सेवा करत होते. या आजारातच वत्सलाबाई यांनी काल अखेरचा श्‍वास घेतला. एकिकडे सारे जग मातृदिन साजरा करत असतांना त्यांच्या मुलांवर आपल्या आईला अखेरचा निरोप देण्याचा प्रसंग आला. त्यामुळे ही घटना मनाला चटका लावून गेली. दरम्यान, वत्सलाबाई यांचा एक नातू उमेश संजय शिंदे सांगली येथे बॅंकेत नोकरीला आहे. कोरोनाच्या काळात बॅंकची सेवा अत्यावश्‍यक सेवेत गणली जात असल्याने व लॉकडाउन असल्याने सांगलीहुन सातारा, कोल्हापुर, नगर असे चार जिल्हे ओलांडून त्याला आजीच्या अंत्यविधीसाठी येणे शक्‍य झाले नाही. शेवटी त्याने मोबाईल व्हिडीओ कॉलने अंत्यदर्शन घेतले. वत्सलाबाई शिंदे यांचा अंत्यविधी मोजक्‍या नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला. 

क्‍लिक कराः Video : भुसावळला कोरोनामुक्त रुग्णांचे फुले उधळून स्वागत; दोन डॉक्टरही...
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news kusumba On Mother's Day by Mother deth