कोरोना पॉझिटिव्ह' आढळल्यानंतर नेहरूनगरचा भाग रात्रीतून "सील' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 मे 2020

वृद्ध रुग्णाला गेल्या 15 दिवसांपासून न्यूमोनियाचा त्रास होत होता. त्याला रिंगरोड परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्याला नुकतेच कोविड रुग्णालयात दाखल केले होते. 

जळगाव  : शहरातील नेहरूनगरात 75 वर्षीय वृद्ध "कोरोना पॉझिटिव्ह' आढळल्यानंतर आज सायंकाळी साडेसातला महापौर भारती सोनवणे यांनी या भागाची पाहणी केली. परिसरात लागलीच सॅनिटायझेशन करून परिसर "सील' करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. दरम्यान, रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना देखील "क्वारंटाइन' करण्यात आले आहे. 

आर्वजून पहा : धक्कादायक: जिल्ह्यात आणखी 19"कोरोना' बाधित! 
 

नेहरूनगरात राहणारे एक वयोवृद्ध रुग्ण "कोरोना पॉझिटिव्ह' आढळून आल्यानंतर खबरदारीसाठी महापौर भारती सोनवणे यांनी लागलीच परिसराला भेट दिली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, ज्योती चव्हाण, जितेंद्र मराठे, नगरसचिव सुनील गोराणे, मलेरिया विभागाचे सुधीर सोनवाल, डॉ. राम रावलानी, डॉ. संजय पाटील, डॉ. विजय घोलप, नितीन सपके आदी उपस्थित होते. 

क्‍लिक कराः सगळ्यांचे चांगले होईल, माझा आर्शिवाद आहे  कोरोनामुक्त महिलेच्या भावना 
 

परिसर केला निर्जंतुक 
रुग्ण आढळून येताच महापौर भारती सोनवणे यांनी परिसर तत्काळ सॅनिटायझेशन करण्यात आला. रुग्णाच्या घरासह परिसरात "सॅनिटायझर' फवारणी मलेरिया विभागाकडून "स्प्रिंकलर' मशिनद्वारे करण्यात आली. 

परिसर "सील' करण्याच्या सूचना 
नेहरूनगर परिसर "सील' करण्याच्या सूचना महापौर भारती सोनवणे यांनी दिल्या. यावेळी सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्यासह एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते. 

नक्की वाचा : डॉक्‍टरसह दोघे कोरोना पॉझिटिव्ह...बाधित एक रूग्णही गरोदर पत्नी, मुलासह पळाला 

रुग्णाचे खासगी रुग्णालयात उपचार 
नेहरूनगरातील या वृद्ध रुग्णाला गेल्या 15 दिवसांपासून न्यूमोनियाचा त्रास होत होता. त्याला रिंगरोड परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्याला नुकतेच कोविड रुग्णालयात दाखल केले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona patient posietive Found and neharu nagar Seal