esakal | जिल्ह्यात खरीप, रब्बीत हंगामात होणार 3300 कोटींचे वाटप 
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात खरीप, रब्बीत हंगामात होणार 3300 कोटींचे वाटप 

जिल्हा बॅंकेने आतापर्यंत 5 हजार 794 सभासदांना 29 कोटी 24 लाखांचे कर्ज वाटप केले. राष्ट्रीयकृत बॅंकेने527 सभासदांना 11 कोटी 95 लाख, ग्रामीण बॅंकेने 116 सभासदांना 21 कोटी 1 लाख, खासगी बेॅकांनी 109 सभासदांना 3 लाख 82 हजारांचा वाटप केले आहे.

जिल्ह्यात खरीप, रब्बीत हंगामात होणार 3300 कोटींचे वाटप 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव  : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बीमासाठी कृषी पत आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. सुमारे 3 हजार 399 कोटी 90 लाखा रूपयापर्यंतचे कर्ज वाटप करण्याचे धोरण बॅंकर्स सल्लागार समितीने ठरविले आहे. लवकरच बॅंकांना ते कळविले जाणार असल्याची सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली. 

नक्की वाचा : अमळनेरकरांनो सावध व्हा...लक्षणे दिसताच तपासणी करा- पालकमंत्री पाटील 
 

खरिपाचा हंगाम जवळ आल्याने पेरणी करण्यासाठी लागणारे बि-बियाणे, खते, साधनसामग्री याची जुळवाजुळव होणार कशी अशी चिंता शेतकऱ्यांना पडली होती. त्यात दिलासादायक बाब म्हणजे 19 एप्रिलला लॉकडाऊन शिथिल करीत कृषी संबंधित दुकाने खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच यासंदर्भात शासनाने साधारणतः: मे महिन्याच्या सुरवातीला शेतकजयांना खते आणि बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. त्यात आता कर्ज वाटप सुरू झाल्याने तेवढा दिलासा मिळत आहे. 

जिल्ह्यात एकूण 3 हजार 318 कोटी 19 लाख 18 हजार रूपये कर्ज वाटपाचा लक्षांक ठेवण्यात आला आहे. आतापर्यंत खरीप कर्जाचे वाटप 47 कोटी 12 लाख 36 हजार एवढेझाले आहे. त्याची टक्केवारी 1.2 टक्‍के आहे. 

क्‍लिक कराः डॉक्‍टरांनी केली टाळाटाळ... रुग्णाला घेवून संतप्त नातेवाईक थेट प्रातांकार्यालयात ! 
 

कर्जवाटपाचे ठरवून दिलेले लक्षांक असे 
जिल्हा बॅंक-1 हजार 26 3कोटी 2 लाख 
राष्ट्रीयकृत बॅंक-1 हजार 548 कोटी 99 लाख 
ग्रामीण बॅंका--31 कोटी 29 लाख 
खासगी बॅंका-- 474 कोटी 87 लाख 
एकूण--3 हजार 318 कोटी 19 लाख. 


 आर्वजून पहा : अनेकांचे प्राण वाचविणाऱ्या चालकाला हेरले कोरोनाने; पंधरावर्षीय मुलीचाही समावेश 
 

विशेष म्हणजे यंदा अद्याप बॅंकांच्या जिल्हा समन्वय समितीची बैठक झाली नसली नाही. मात्र ज्या शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा आहे, अशा शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले जात आहे. महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अडीच लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला. त्यामुळे अडीच लाखापर्यंतचे कर्जमुक्त झालेले शेतकरी कर्जासाठी पुन्हा पात्र ठरले आहेत. 

loading image