डॉक्‍टरांनी केली टाळाटाळ... रुग्णाला घेवून संतप्त नातेवाईक थेट प्रातांकार्यालयात ! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 एप्रिल 2020

डॉक्टराने तुम्ही ग्रामीण रुग्णालयात जाऊन तेथून पत्र आणा असे सांगितले. या मुळे नातेवाईकांनी आपल्या प्रभागातील नगरसेवक नरेंद्र संदानशिव यांना सांगितले. 

अमळनेर: कोरोनाचा संशय घेऊन अमळनेर येथील काही स्थानिक डॉक्टर रुग्णांचा उपचार करण्यास टाळाटाळ करीत आहेत. या मुळे अनेक रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. काही डॉक्टर तपासणी न करता सरळ सांगतात की ग्रामीण रुग्णालय अथवा जिल्हा रुग्णालयात घेऊन जा. किंवा ग्रामीण रुग्णालयाचे पत्र आणा तेव्हा आम्ही आमच्या रुग्णालयात रुग्ण दाखल करतो. 

नक्की वाचा : जळगाव जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण; दोघांचाही मृत्यू 

आज अमळनेर शहरात अशीच एक घटना घडली. या बाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागात राहणाऱ्या शेहेजाबी शेख महम्मद शेख ह्या महिलेला आज सकाळी सुमारे 10 वाजता हृदयविकाराचा झटका आला. तिच्या नातेवाईकांनी तिला शहरातील काही बड्या डॉक्टरांकडे घेऊन गेले. मात्र डॉक्टरांनी तिची तपासणी न करता तिला कोरोनाचा संशय घेत रुग्णालयात दाखल न करण्याचे संगीतले व त्यांना रुग्णालयाच्या बाहेर काढले. त्या नंतर एका डॉक्टराने तुम्ही ग्रामीण रुग्णालयात जाऊन तेथून पत्र आणा असे सांगितले. या मुळे नातेवाईकांनी आपल्या प्रभागातील नगरसेवक नरेंद्र संदानशिव यांना सांगितले. 
 

आर्वजून पहा : अनेकांचे प्राण वाचविणाऱ्या चालकाला हेरले कोरोनाने; पंधरावर्षीय मुलीचाही समावेश 
 

त्यांनी लगेच रुग्णालयात धाव घेत व डॉक्टरांना समजावून सुद्धा त्या डॉक्टरांनी ऐकले नाही. नंतर ते रुग्ण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले मात्र तेथे गेल्यावरही तेथील डॉक्टरांनी त्या महिलेस धुळे घेऊन जाण्यास सांगितले. मात्र धुळे घेऊन जाऊन लॉकडाऊन मुळे बाकीची व्यवस्था कशी करावी. या विचारांनी त्रासलेल्या संतप्त नातेवाईकांनी त्या महिलेस सरळ अमळनेर येथील प्रांत कार्यालयात आणले व प्रांताधिकारी यांना विचारणा केली असता. त्यांनी संबंधित डॉक्टरांशी बोलून त्या महिलेस आपल्या रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. व त्या महिलेस त्या ठिकाणी उपस्थित नातेवाईक तसेच संबंधित प्रभागाचे नगरसेवक नरेंद्र संदानशिव यांनी त्या महिलेस त्या संबंधित रुग्णालयात दाखल केले आहे. म्हणून शहरातील डॉक्टरांनी आपली सुरक्षा राखत रुग्णांना आधी तपासून घ्यावे नंतर कोरोना बाबत संशय घ्यावा असा सूर जनमानसातुन उमटत आहे.

क्‍लिक कराः वहिवाटीच्या रस्त्यावरून घडले भलतेच 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner doctar not Treatment by pishant Angry relatives