जळगाव जिल्ह्यात कोरोनचाचा आलेख वाढताच...20 दिवसांत सव्वाशे पार 

coronavirus
coronavirus

जळगाव  : पहिल्या लॉकडाऊनच्या काळात जळगाव जिल्ह्यात बऱ्यापैकी नियंत्रणात दिसत असलेला कोरोनाचा संसर्ग दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये मात्र प्रचंड वाढल्याचे भयावही चित्र समोर येत आहे. 18 एप्रिलपर्यंत दोघा कोरोना बाधितांपैकी एकाचा मृत्यू तर एक जण बरा होऊन जळगाव जिल्हा "ग्रीन झोन' बनला असताना 18 पासून सुरु झालेले बाधितांचे सत्र आजपर्यंत कायम असून या अवघ्या 20 दिवसांत जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्येने शंभरी पार करुन आज ही संख्या 124वर पोचली आहे. तर मृतांचा आकडाही एकवरुन वाढून 15पर्यंत पोचल्याने प्रशासकीय यंत्रणेची झोप उडाली आहे. 

कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर 24 मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊन सुरु आहे. पहिल्या लॉकडाऊनचा कार्यकाळ 14 एप्रिलला संपून ते 3 मेपर्यंत वाढविण्यात आले, व पुन्हा 17 मेपर्यंत वाढले आहे. पहिल्या लॉकडाऊनच्या काळात जळगाव जिल्ह्यात अवघे दोन रुग्ण होते, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला होता. तर दुसरा रुग्ण 17 तारखेला बरा होऊन घरीही गेला. नवा कुणीही बाधित रुग्ण नसल्याने त्या दिवशी जिल्हा "ग्रीन झोन' बनला. 

18 एप्रिलपासून संसर्गाचे सत्र 
मात्र, 18 एप्रिलपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरु झाला व नंतर आजपर्यंत टप्प्याटप्प्याने प्रचंड वाढत गेला. 18 एप्रिलला अमळनेर तालुक्‍यातील मुंगसे येथील महिला बाधित आढळून आली, नंतर जवळपास दररोज बाधितांमध्ये वाढ होऊन ही यादी वाढतच गेली. अगदी 30 एप्रिलपर्यंत दोन, तीन, पाच या संख्येत बाधितांमध्ये भर पडत गेली. गेल्या तीन दिवसांत तर नव्या बाधितांचा आकडा दररोज दोनअंकी संख्येत वाढतोय. 6 मेस तब्बल 23 बाधित रुग्ण निष्पन्न झाले, तर गुरुवारी 7 मेस 15 रुग्णांची भर पडली आणि जिल्ह्याने शंभरी गाठली. शुक्रवारी (ता. 8) दिवसभरात 24 इतके रुग्ण वाढून एकूण संख्या 124 इतकी झाली. सातत्याने वाढत असलेल्या या आलेखामुळे जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा हादरली असून नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. 

अमळनेर बनले हॉटस्पॉट 
जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक प्रभावित क्षेत्र ठरलेय ते अमळनेर. अमळनेर तालुक्‍यात मुंगसे येथे पहिली कोरोना बाधित महिला आढळून आल्यानंतर शहरातही त्याचा प्रभाव वाढू लागला व 8 मे अखेरीस अमळनेरमध्ये तब्बल 68 रुग्ण होते. त्यासोबत भुसावळ, पाचोरा व जळगाव शहरातही प्रभाव वाढत आहे. 

कोरोनाचा ग्राफ (जळगाव जिल्हा) 
तारीख--------- बाधित-------- मृत्यू 
28 मार्च-------01--------0 
1 एप्रिल--------01-------01 
18 एप्रिल------01-------0 
21 एप्रिल -----02-------02 
23 एप्रिल------02-------0 
24 एप्रिल -----05-------01 
25 एप्रिल -----03------0 
26 एप्रिल -----04------01 
27 एप्रिल -----04------02 
28 एप्रिल ------04-----02 
29 एप्रिल -----01------0 
30 एप्रिल -----06-----02 
1 मे ----------04-----01 
2 मे ----------04------01 
3 मे ---------07------0 
4 मे ---------05------0 
5 मे ----------05-----0 
6 मे ----------23 ----01 
7 मे ---------15------01 
8 मे ---------24------02 
-------------------------------- 
एकूण--------124------16 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com