आता सायंकाळी सातनंतर जमावबंदी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 मे 2020

जिल्ह्यात "कोरोना पॉझिटिव्ह' रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सार्वजनिक, खासगी जागेत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, कार्यक्रमांचे आयोजन करणे आरोग्यास धोकादायक आहे.

जळगाव : "कोरोना' विषाणूच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यात अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. "लॉकडाउन' 17 मेपर्यंत वाढविण्यात आल्याने सायंकाळी सातनंतर अत्यावश्‍यक सेवा वगळता इतरांना मुक्तपणे संचार करण्यास मनाई असल्याचे आदेश आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आहेत. ते उद्या (ता. 4) मध्यरात्रीपासून 17 मेपर्यंत लागू असतील. 

नक्‍की पहा - प्रशासनाच्या झोपेमुळे जळगाव बनले "हॉटस्पॉट' 

जिल्ह्यात "कोरोना पॉझिटिव्ह' रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सार्वजनिक, खासगी जागेत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, कार्यक्रमांचे आयोजन करणे आरोग्यास धोकादायक आहे. यामुळे तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 च्या तरतुदींच्या अनुषंगाने जमावबंदीचे आदेश काढण्यात आले आहेत. 

हेही पहा - अन्‌ बंदोबस्तातून पोलिसांनी काढला पळ...काय आहे कारण वाचा

आदेशान्वये जिल्ह्यात सायंकाळी सात ते सकाळी सात या वेळेत अत्यावश्‍यक बाब वगळता, अनावश्‍यक फिरण्यास, मुक्तपणे संचार करण्यास मनाई आहे. यात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित व अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात प्रत्येकाला तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे. उघड्यावर, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी आहे. 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गर्भवती माता, दहा वर्षांखालील बालके, गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी घरीच राहावे. त्यांना अत्यावश्‍यक सेवा, वैद्यकीय सेवा घेण्यासाठी मुभा असेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus evening sevan clock janavbandi collector order