coronavirus : मॉलमधील शॉपिंगला विराम; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 मार्च 2020

जळगाव : "कोरोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी आज सर्व शॉपिंग मॉलमधील दुकाने, आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याची अंमलबजावणी उद्यापासून (ता.17) सुरू होईल.

हेपण पहा - CoronaVirus : कोरोनाच्या धास्तीने आठवडे बाजारात शुकशुकाट

जळगाव : "कोरोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी आज सर्व शॉपिंग मॉलमधील दुकाने, आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याची अंमलबजावणी उद्यापासून (ता.17) सुरू होईल.

हेपण पहा - CoronaVirus : कोरोनाच्या धास्तीने आठवडे बाजारात शुकशुकाट

त्याबाबत पोलिस प्रशासन, महापालिका, पालिका प्रशासनाला आदेश दिले आहेत. आदेशाची उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. 
सर्व खासगी क्‍लासेस, अभ्यासिका, ट्यूशन्सही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचीही अंमलबजावणी होणार आहे. 
गेल्या शनिवारी राज्य शासनाने 31 मार्चपर्यंत सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या "बंद'चे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी आजपासून सर्व शाळा, महाविद्यालयांनी सुरू केली आहे. 

coronavirus : जळगावातील दोघा संशयितांचे नमुने पुण्याला

त्याचबरोबर काल जिल्ह्यातील नगरपालिका, महापालिका क्षेत्रातील चित्रपटगृहे, तरणतलाव, व्यायामशाळा, नाट्यगृहे, म्युझियम 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेशही काढले. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. आता सर्व मॉलमधील सर्व दुकाने, आस्थापने बंद ठेवली जाणार आहे. यामुळे नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळता येईल. व कोरोनोचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार आहे. 
 
शासनाच्या आदेशानुसार शॉपिंग मॉलमधील दुकाने, आस्थापना बंद ठेवली जातील. किराणा दुकान, दूध, मेडीकल्स सुरू ठेवली जातील. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. तोंडाला रुमाल बांधावा. स्वच्छता बाळगावी, जेणेकरून "कोरोना'चा प्रादुर्भाव टाळता येईल. 

- डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus impact shopping moll closed tomorrow collector order