esakal | "मास्क लावा, तर माल मिळेल'डेअरी चालकाची सजगता 

बोलून बातमी शोधा

mask

"कोरोना'चा संसंर्ग रोखण्यासाठी जळगाव शहर "लॉक डाऊन'करण्यात आले आह. या ठिकाणी केवळ अत्यावश्‍यक सुविधांचे दुकाने सुरू आहेत. या दुकानादारांनीही आता जनतेसाठी सजगता दाखविली आहे.

"मास्क लावा, तर माल मिळेल'डेअरी चालकाची सजगता 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव :"कोरोना'चा संसर्ग रोखण्यासाठी शासन तसेच सामाजिक कार्यकर्ते आपआपल्या परिने प्रयत्न करीत आहेत. परंतु जनतेचाही त्यात सहभाग आवश्‍यक आहे. जळगावात एका डेअरी चालकांने मास्क लावल्याशिवाय ग्राहकांना माल देण्यास नकार दिला आहे. 

हेपण पहा -तृतीयपंथीयाचा "तो' खोटा शाप मध्यरात्री महिलांना घेऊन गेला स्मशानभूमीत...


"कोरोना'चा संसंर्ग रोखण्यासाठी जळगाव शहर "लॉक डाऊन'करण्यात आले आह. या ठिकाणी केवळ अत्यावश्‍यक सुविधांचे दुकाने सुरू आहेत. या दुकानादारांनीही आता जनतेसाठी सजगता दाखविली आहे. शहरातील विसनजी नगर भागातील विजय डेअरी च्या चालकांनी मास्क लावल्याशिवाय ग्राहकांना माल देण्यास नकार दिला आहे. त्यांनी चक्क आपल्या दुकानावर फलकच लावला आहे. प्रत्येकांने मास्क लावूनच माल घेण्यास यावे, मास्क न लावणाऱ्या ग्राहकास माल मिळणार नाही. त्यांनी चक्क मास्क लावणाऱ्या ग्राहकांना माल न देता परत पाठविले आहे. विजय डेअरीच्या संचालकाप्रमाणे सर्वच दुकानदारांनी अशी सजगता दाखविली तर "कोरोना'चा संसर्ग रोखण्यास निश्‍चितच फायदा होणार आहे. 
विजय डेअरीचे संचालक कृणाल वाणी यांनी याबाबत सांगितले, "कोरोना'व्हायरस रोखण्यासाठी सर्वानीच सजगता दाखविण्याची गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकांने त्याचे पालन केले पाहिजे. त्यामुळे आपण आपल्यापासून ही सुरूवात केली आहे. ग्राहक माल घेण्यास आल्यास त्यांना आपण मास्क किंवा रूमाल लावून या असे सांगतो. अगदी मेडिकल दुकानदारांनी तसेच इतर दुकानदारांनीही ही सक्ती करण्याची गरज आहे. मास्क व रूमाल लावण्याचा आग्रह केला तरच आपण "कोरोना'शी लढाई करून जिंकणार आहोत.