जावाई, भाच्यांना वाण देण्यासाठी दोनशेच्या पॅकेज बाजारात धुम 

जगन्नाथ पाटील   
Thursday, 8 October 2020

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जावई आणि भाचे अधिकमासच्या वाणपासून वंचित होते. मासच्या उत्तरार्धात धुळे बाजारातील दुकानदारांनी मोठी शक्कल लढविली आहे.

कापडणे  : कोरोनाचा प्रादुर्भाव, लॉकडाउन, प्रवासाच्या अडचणी आणि क्‍वारंटाइन आदी कारणांमुळे जावई आणि भाचे अधिकमासच्या भेटीपासून वंचित राहत होते. आता दुकानदारांनी वाण भेटीच्या वस्तूंचे दोनशे रुपयांचे पॅकेज तयार केले आहे. हे घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. जावई आणि भाच्याला घरपोच पॅकेज दिले जात आहे. या पॅकेजचे स्वागत होत आहे. 

वाचा- कोरोना नाही तरी ही एकाच कुटुंबातील तिघांचा दोन महिन्यात मृत्यू !
 

जावई, भाच्याना घरपोच पॅकेज खानदेशात अधिकमासला मोठे महत्त्व आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जावई आणि भाचे अधिकमासच्या वाणपासून वंचित होते. मासच्या उत्तरार्धात धुळे बाजारातील दुकानदारांनी मोठी शक्कल लढविली आहे. दोनशे रुपयांमध्ये मासच्या वाणचे पॅकेज उपलब्ध करून दिले आहे. यात थाळी, बत्तासे, दिवे, अनारसे, वाती बंदिस्त केल्या आहेत. या वाणाच्या पॅकिंगला मागणी वाढली आहे. ते पॅकिंग थेट जावई व भाच्यापर्यंत पोच केले जात आहे. यामुळे समाधान व्यक्त होत आहे. 

 

अधिक वाणाच्या वस्तू व पदार्थ विक्रीचा व्यवसाय ३० वर्षांपासून करीत आहे. या वेळेस व्यवसाय अयशस्वी होण्याचे लक्षात आले. अन् आम्ही व्यावसायिकांनी पॅकेज व पॅकिंगमध्ये आणले. उत्तरार्धात ग्राहक वाढले आहेत. 
-जितेंद्र कोतकर, फुलवाला चौक 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon demand for this specialty has grown significantly as a result of recent corporate scandals