आता तरी "भाजप' एकनाथराव खडसेंना संधी देणार का ?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 May 2020

भविष्यात राजकीय उलथापालथ झाल्यास आणि सत्तासमिकरणाची गणित जुळविण्याची गरज असल्यास अशा स्थितीत पक्षाला खडसे यांच्या राजकीय अनुभवाचाही फायदा होण्याची शक्‍यता आहे.

जळगाव : राज्यात भारतीय जनता पक्षाकडे सर्वात जास्त 105 आमदार आहेत. मात्र आज पक्षाकडे सर्वात मोठी आमदारांची संख्या असतांनाही सत्तेत ते येवू शकले नाही. त्यामुळे एकनाथराव खडसे यांच्या कौशल्य व आक्रमकपणाचा उपयोग करून घेण्यासाठी भाजपच्या गटात आता खडसेंना विधानपरिषदेवर घेण्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्याच्या विधानसभा निवडणूकीत भाजपच्या वाट्याला सहा जागा असून त्यात खडसेंना आमदारकिची संधी देवून राज्यात भाजप पक्षात बळकटीसाठी तसेच भविष्यातील सत्ता समिकरणासाठी विचार केला जात आहे. 

नक्की वाचा : "आरोग्य सेतु ऍप' पाकिस्थानी हॅकर कडून हॅक? 
 

एकनाथराव खडसे हे लेवा पाटील समाजाचे ते एकमेव राजकीय नेते आहेत. ते भाजपच्या ओबीसी नेत्यांपैकी महत्वाचे नेते आहे. त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे खासदार आहे. एकनाथराव खडसे यांचे नेतृत्व आक्रमक त्यांनी ग्रामपंचायत ते थेट राज्याचा विरोधी पक्षनेत्यापर्यंत मजल मारली आहे. मात्र 2019 च्या विधानसभेच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने खडसे यांचे खच्चीकरण केले त्यांना उमेदवारीही नाकारली. त्यामुळे कोणत्या पक्षात खडसे जातात याकडे सर्वांचे लक्ष होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, कॉंग्रेस पक्षाकडून देखील त्यांना ऑफर आल्या होत्या. 

क्‍लिक कराः बनावट पास घेवून कारमधून प्रवास...पोलिसांनी घेतले ताब्यात 
 

खडसेंची भूमीका ठरणार महत्वाची 
विधानसभा निवडणूकीच्या काळात त्यांना भाजपने टिकीट नाकारले तसेच खडसेंनी दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही हा निर्णय चुकीचा ठरला अशी चर्चा जरी असली तरी खडसेंनी गोपीनाथ गडावर जाणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार तसेच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेवून त्यांनी राजकारणात आपले अजून किती महत्व आहे हे दाखवून दिले होते. तसेच सर्वात जास्त आमदार असून भाजपला सत्ता मिळवता आली नसल्याने खडसेंचे महत्व त्यात वाढलेले आहे. भविष्यात राजकीय उलथापालथ झाल्यास आणि सत्तासमिकरणाची गणित जुळविण्याची गरज असल्यास अशा स्थितीत पक्षाला खडसे यांच्या राजकीय अनुभवाचाही फायदा होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे खडसेंना विधानपरिषदेवर पक्षातर्फे संधी मिळू शकते याबाबतही खडसे यांच्या गटासह त्यांच्या विरोधी गटातही देखील सद्या चर्चा रंगू लागल्या आहे. 

आर्वजून पहा : जळगाव शहरात दोन कोरोना बाधित रूग्ण 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Eknathrao Khadse bjp Opportunity by mlc election