esakal | खादी ग्रामोद्योगची जागा अखेर सरकार जमा 
sakal

बोलून बातमी शोधा

khadi gram udyog bildin jalgaon imege

जिल्हाधिकारी खादी ग्रामोद्योगाची जागा शासनाकडे जमा करण्याचे आदेश तहसीलदार वैशाली हिंगे यांना दिले. त्यांनी मंडलाधिकारी योगेश नन्नवरे, शहर तलाठी रमेश वंजारी, नगरभूमापक जे. यु. कदम, कोतवाल सुकदेव तायडे यांनी पोलिस बंदोबस्तात जागा जमा करण्याची कार्यवाही केली. 

खादी ग्रामोद्योगची जागा अखेर सरकार जमा 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगावः येथील टॉवर चौकातील खादी ग्रामोद्योगाची जागा आज अखेर सरकार जमा करण्यात आली. ही जागा सामाजिक सेवेसाठी दिली होती. 
मात्र या जागेचा वापर व्यवसायासाठी केला जात होता. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या आदेशान्वये आज सकाळी अकराला सुरू झालेली जागा जमा करण्याची कारवाई दुपारी अडीचला पूर्ण झाली. यावेळी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. 

माहिती अधिकारी कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी खादी ग्रामोद्योगाच्या जागेबाबत माहितीच्या अधिकाराद्वारे माहिती मागितली होती. त्यात जिल्हा प्रशासनाकडून 1600 चौरस फूट एवढी जागा 1964-65 मध्ये जिल्हा सर्व सेवा समितीचे अध्यक्ष लखीचंद झंवर यांना देण्यात आली होती. संस्थेने काही वर्ष खादी ग्रामोद्योगचे कपडे, गांधी विचारांचे पुस्तके, साहित्य विक्री करण्याचे दुकान सुरू केले. मात्र नंतर जागा व्यावसायिकांना भाड्याने देण्यात येत होती. 

क्‍लिक कराः   नेहेते परिवाराने जोपासला दधींचीचा वारसा

त्याबाबत श्री. गुप्ता यांनी अपील दाखल केल्याने जिल्हाधिकारी खादी ग्रामोद्योगाची जागा शासनाकडे जमा करण्याचे आदेश तहसीलदार वैशाली हिंगे यांना दिले. त्यांनी मंडलाधिकारी योगेश नन्नवरे, शहर तलाठी रमेश वंजारी, नगरभूमापक जे. यु. कदम, कोतवाल सुकदेव तायडे यांनी पोलिस बंदोबस्तात जागा जमा करण्याची कार्यवाही केली. 

आर्वजून पहा : अर्थसंकल्प : नंदुरबारच्या मेडिकल कॉलेज साठी हवेत 160 कोटी
 

दुकाने झाली बंद 
खादीग्रामोद्यागाच्या जागेत दुमजली बांधकाम आहे. त्यात जे. पी. व्हेंचर-कोल्हापूर मशिनरी, नारायण हरिराम जोशी यांना हॉटेलसाठी (हॉटेल पकवान) आदी व्यावसायिकांना भाड्याने दिली होती. ही सर्व दुकाने आता बंद झाली आहेत. आजच्या कारवाईत पाच दुकाने सील करण्यात आली आहेत. 

नक्की वाचा : मयत खाते धारकांना वारस लावुन कर्जमाफीचा लाभ