जळगावात "मे हिट'चा तडाखा; पारा 44 अंशावर 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 May 2020

उन्हाची तिव्रता वाढल्यानंतर दुपारी बारा ते सायंकाळी पाचपर्यंत फारशे कोणी बाहेर निघत नव्हते. यंदा मात्र कोरोना व्हायरसमुळे जास्त गर्दी टाळण्याचे आदेश असल्याने दुपारी उन्हाची तिव्रता असताना देखील वस्तू घेण्यासाठी रस्त्यांवर वरदळ पाहण्यास मिळत आहे.

जळगाव : यंदाच्या उन्हाळ्यातील असह्य होणाऱ्या उष्ण झळा गेल्या काही दिवसांपासून जाणवू लागल्या आहेत. मे महिन्या दुसऱ्या आठवड्याला सुरवात झाली असताना जळगावकरांना "मे हिट'चा तडाखा जाणवू लागला आहे. पारा देखील एक अंशाने वर सरकला असून तापमान 44 अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. 

आवर्जून वाचा - मुंबई ते धुळे...आधुनिक श्रावणबाळाने चक्क वृध्द पित्याला नेले खांद्यावर 

कोरोना व्हायरसमुळे गेल्या दीड महिन्यापासून सर्वांची जीवनशैली बदलली आहे. ऐरवी दरवर्षी उन्हाळ्यात दुपारच्यावेळी अघोषित संचारबंदी पाहण्यास मिळत होती. अर्थात उन्हाची तिव्रता वाढल्यानंतर दुपारी बारा ते सायंकाळी पाचपर्यंत फारशे कोणी बाहेर निघत नव्हते. यंदा मात्र कोरोना व्हायरसमुळे जास्त गर्दी टाळण्याचे आदेश असल्याने दुपारी उन्हाची तिव्रता असताना देखील वस्तू घेण्यासाठी रस्त्यांवर वरदळ पाहण्यास मिळत आहे. तरी देखील खबदरदारी म्हणून डोक्‍याला रूमाल किंवा टोपी वापरली जात आहे. 

हिट वाढली 
उन्हाळ्यात सर्वाधिक तापमानाची नोंद जळगावमध्ये होत असते. यंदा काहीसा उशिराने सुरू झालेल्या उन्हाळ्यामुळे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून तापमानाची तिव्रता अधिक वाढण्यास सुरवात झाली होती. परंतु गेल्या आठवडाभरापासून उष्णतेत अधिक वाढ झाल्याने हिट देखील वाढली आहे. आग ओकणाऱ्या सुर्यामुळे असह्य उन्हाच्या तिव्र झळा जाणवत आहेत. रात्री उशिरापर्यंत झळा जाणवत आहेत. 

प्रथमच पारा 44 अंशावर 
जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यातील चटके काहीसे कमी होते. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून चटक्‍यांची तिव्रता वाढली होती. मात्र आतापर्यंत पारा 43 अंश सेल्सिअसवर स्थिरावलेला होता. यात एका अंशाने वाढ होवून 44 अंश सेल्सिअसवर पोहचला आहे. यंदाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद आज (ता.9) झाली. पारा 44 अंशावर पोहचल्याने उन्हाचे चटके असह्य होवू लागले आहेत. यामुळे आता उष्माघाताचा धोका देखील वाढला आहे. 

अन्‌ सुरू झाली कुलर खरेदी 
उन्हाच्या तिव्र झळा आणि वाढलेल्या उकाड्यामुळे नागरीक हैराण होवू लागली आहे. यातच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन सुरू असल्याने गेल्या दीड महिन्यापासून सर्व दुकाने बंद होती. परंतु तीन दिवसांपासून लॉकडाउन थोडे शिथील करण्यात आल्याने यामुळे कुलर विक्रीचे दुकाने देखील खुले झाले होते. यामुळे अनेक नागरीकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी कुलरची खरेदी केल्याचे चित्र पाहण्यास मिळत होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon high temperature 44 digree