हुक्‍क्‍याचे "दम मारो दम' पोखरतेय तारुण्य 

रईस शेख
मंगळवार, 17 जुलै 2018

जळगाव : पोलिसांच्या कारवाईने मोठ्या हॉटेल्स्‌मधील बिगडे नवाबांच्या मैफलींचे नागडे सत्य उघड झाले असून, भारतातील तारुण्य पोखरणारी खास "लिक्विड तंबाखू' थेट आखाती देशातून येत असल्याचे सत्य समोर आले आहे. पोलिसांच्या छाप्यातून जप्त "फ्लेवर्ड' तंबाखूच्या निर्मितीत अल-फकीर, अफजल या कंपन्यांची मक्तेदारी आहे. शहरातील जवळपास सर्वच मोठ्या हॉटेल्समध्ये "प्रेस्टीज' म्हणून हुक्का उपलब्ध असून तरुणांमध्ये तो विशेष लोकप्रिय आहे. 

जळगाव : पोलिसांच्या कारवाईने मोठ्या हॉटेल्स्‌मधील बिगडे नवाबांच्या मैफलींचे नागडे सत्य उघड झाले असून, भारतातील तारुण्य पोखरणारी खास "लिक्विड तंबाखू' थेट आखाती देशातून येत असल्याचे सत्य समोर आले आहे. पोलिसांच्या छाप्यातून जप्त "फ्लेवर्ड' तंबाखूच्या निर्मितीत अल-फकीर, अफजल या कंपन्यांची मक्तेदारी आहे. शहरातील जवळपास सर्वच मोठ्या हॉटेल्समध्ये "प्रेस्टीज' म्हणून हुक्का उपलब्ध असून तरुणांमध्ये तो विशेष लोकप्रिय आहे. 
शहरातील मोठ-मोठ्या हॉटेल्समध्ये स्पेशल रूममध्ये उपलब्ध असलेल्या या हुक्‍क्‍यांनी बाहेर गावाहून शिक्षणासाठी जळगावात आलेल्या तरुणांना नादी लावल्याची माहिती आता समोर येत आहे. विविध महाविद्यालयांच्या परिसरात सर्रास हुक्का पार्लर चालवले जात असल्याचे हुक्का पेणाऱ्या तरुणांशी चर्चा केल्यावर माहिती समोर आली. 

सेलेब्रेशनला होते मागणी 
हुक्का ओढणे हा देखील गुन्ह्याचा प्रकार आहे, हे सुद्धा या अल्पवयीन तरुणांना माहिती नसताना अगदी बर्थ-डे पार्टी, परीक्षांचे निकाल असो सोबत शिक्षण घेणारे मुलं-मुली हुक्का पार्टी देतात. शहरातील हॉटेल ग्रेपीज्‌वर पडलेल्या छाप्यात ताब्यात घेतलेले सर्वच्या सर्व विद्यार्थी आणि त्यांना हुक्का देणारे चार वेटर असे वीस संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले होते. यात ताब्यात घेतलेल्या सर्व संशयितांना प्रत्येकी दोनशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, हॉटेलवर कारवाई संदर्भात माहिती मागविण्यात आली आहे. 

हुक्‍क्‍यातील नशेचा "बुक्का' 
हुक्‍क्‍यामध्ये वापरली जाणारी विविध फळे आणि फुलांच्या फ्लेवरमध्ये लिक्विड तंबाखू वापरली जाते. पारंपरिक हुक्‍क्‍यात तंबाखूचा चिरूट आणि कोळसा होता, आधुनिक हुक्‍क्‍यात मात्र ती जागा आता फ्लेवर्ड तंबाखूने घेतली आहे. याच फ्लेवर्ड तंबाखूला अफूची गोळी व गांजाची पूड टाकून अधिक "डार्क-स्ट्रॉंग' करण्यात येते, या नशेची किक साधारण 8 ते 10 तास टिकते.. नंतर हळूहळू कमी होते. 

आखाती देश मुख्य पुरवठादार 
फ्लेवरमध्ये स्ट्रॉबेरी, ऑरेंज, बनाना, ऍपल, डबल ऍपल, मॅंगो अशा अनेक फळा, फुलांचा समावेश असतो. या फ्लेवरचा एक डबा सुमारे 80 ते 100 रुपयांना बाजारात उपलब्ध असतो. परंतु, पार्लरमध्ये एका फ्लेवरसाठी तासाला 200 ते 300 रुपये असा दर ग्राहकाकडून घेतला जातो. या फ्लेवर उत्पादनात स्थानिक अफजल, तर आखाती देशातील अलफकीर कंपनी आघाडीवर असून आखाती देशातील ब्रॅण्डला प्रचंड मागणी असते. जादा पैसा मोजून आखाती ब्रॅंड घेतले जातात. 
 
पार्लरचा मार्केटिंग फंडा 
- हुक्‍क्‍याचे दुष्परिणाम होत नाही 
- कॅन्सरचा धोका निम्मा होतो 
- ऍसिडिटी कमी होते 
- पोटाची चरबी कमी होते 
- पचन चांगले होते 

Web Title: marathi news jalgaon hukka youth ganration