जळगावकरांना दिलासा...! अखर्चिक 24 कोटी निधी खर्चाला मुदतवाढ मिळाली

जळगावकरांना दिलासा...! अखर्चिक 24 कोटी निधी खर्चाला मुदतवाढ मिळाली

जळगाव ः शासनाच्या नगरविकास विभागाने विविध योजनांतर्गत प्राप्त झालेला अखर्चिक निधी खर्च करण्यास 31 मे 2020 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबतचा अध्यादेश आज काढला. त्यामुळे जळगाव महापालिकेस मिळालेला विविध निधी गेल्या तीन- चार वर्षांपासून मुदतीत खर्च झाला नव्हता. असा सुमारे 24 कोटींचा निधी परत जाण्याची दाट शक्‍यता होती. परंतु, शासनाकडून तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाल्याने महापालिकेस दिलासा मिळाला आहे. 

शहराच्या विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला 25 कोटींचा निधी दिला होता. त्यानंतर विशेष मूलभूत सुविधांसाठी 10 कोटींचा निधी दिला होता. दरम्यान, 25 कोटींच्या निधीतून 10 कोटी 22 लाखांचा निधी खर्च झाला असून, 14 कोटी 88 लाखांचा निधी अखर्चिक आहे. तर विशेष मूलभूत सुविधांसाठी 5 कोटी आणि पुन्हा 5 कोटी अशा एकूण 10 कोटींच्या निधीतून 2 कोटी 30 लाखांचा निधी खर्च झाला असून, 7 कोटी 70 लाखांचा निधी अखर्चिक होता. 

आर्वजून पहा : कुटूंबीय लग्नाच्या तयारीत...तेवढ्यात पडला छापा ! 

महापौरांनी घेतली दखल 
महापालिकेत अखर्चिक निधीला मिळालेल्या मुदतवाढीची माहिती मिळताच तत्काळ महापौर भारती सोनवणे यांनी दखल घेत मक्तेदारांची बुधवारी बैठक बोलावली. यावेळी उपमहापौर डॉ. अश्‍विन सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, भगत बालाणी तसेच मुख्य लेखापरीक्षक संतोष वाहुळे, मुख्य लेखाधिकारी कपिल पवार, बांधकाम अभियंता सुनील भोळे, वीज विभागप्रमुख बाबा साळुंखे तसेच मक्तेदार उपस्थित होते. 

क्‍लिक कराः  यावला बॅटरीचा स्फोटात; चार मजूर गंभीर जखमी 

महिनाभरात कामे मार्गी लावा : महापौर 
विविध निधीतील प्रलंबित कामे निधीअभावी मक्तेदारांनी कामे अर्धवट अवस्थेत तसेच सुरू केले नव्हते. यावेळी बैठकीत महापौरांनी मक्तेदारांना निधी परत जाणार नसून तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली असल्याचे सांगितले. उद्यापासूनच कामाला सुरवात करून महिना-दोन महिन्यात काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. जो काम पूर्ण करणार नाही, त्याला कोणतीही मदत केली जाणार नसल्याच्या स्पष्ट सूचना यावेळी मक्तेदारांना दिल्या. मक्तेदारांनी विविध समस्यांचा यावेळी पाढा मांडला. तर एका मक्तेदाराने एका महापालिका अधिकारी पैसे मागत असल्याचे सांगितले. यावेळी महापौरांनी लेखी तक्रार करण्याबाबत सांगितले. 

आता होणार 23 कोटी 80 लाखांची कामे 
31 मे 2020 पर्यंत 25 कोटी निधीतील 14 कोटी 88 लाख आणि विशेष मूलभूत सुविधांमधील 10 कोटी निधीपैकी 7 कोटी 70 लाख, तसेच रस्ते दुरुस्ती विशेष निधीतील 1 कोटी 26 लाख असे एकूण 22 कोटी 58 लाखांचा निधीत दिलेल्या मुदतीत खर्च करावे लागणार आहे. अथवा अखर्चिक निधी परत जाण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. त्यामुळे आता 23 कोटी 80 लाखांची कामे करावी लागणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com