esakal | "कोरोना' प्रतिबंधासाठी मनपा प्रशासन सज्ज! 
sakal

बोलून बातमी शोधा

jmc imege

कोरोना व्हायरसचे जिल्ह्यात कुठेही संशयित रूग्ण नसून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रुग्णालयात महिला व पुरुषांचे दोन स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

"कोरोना' प्रतिबंधासाठी मनपा प्रशासन सज्ज! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगावः कोरोना व्हायरस आजाराचे जगभरात थैमान असून, भारतात देखील संशयित रुग्ण आढळल्याने नागरिकांनी दक्षता घेणे आवश्‍यक झाले आहे. कोरोना व्हायरस शहरात येऊच नये, यासाठी तत्काळ आवश्‍यक त्या उपाययोजना व जनजागृती करण्याच्या सूचना महापौर भारती सोनवणे यांनी आज दिल्या. 

आर्वजून पहा : सोने तेजाळले; उच्चांकी 44 हजारांचा दर 

जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्या दालनात महापौर भारती सोनवणे यांनी आज सकाळी अकराला बैठक घेतली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, उपायुक्त मिनीनाथ दंडवते, महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा उगले, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रा. बाबा नाखले, आरोग्यदूत अरविंद देशमुख आदी उपस्थित होते. अधिष्ठाता डॉ. खैरे यांनी कोरोना व्हायरसचे जिल्ह्यात कुठेही संशयित रूग्ण नसून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रुग्णालयात महिला व पुरुषांचे दोन स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वैद्यकीय रुग्णालयातील घनकचरा दररोज घेऊन जाण्यासाठी महापालिकेने घंटागाडी पाठविण्याची विनंती केली असता महापौरांनी तत्काळ त्याबाबत सूचना दिल्या. उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांनी जिल्हा रुग्णालय आवारातील कर्मचारी योग्य पद्धतीने स्वच्छता करीत नसल्याची बाब निर्देशनास आणून दिली असता अधिष्ठाता यांनी मक्तेदाराला सूचना देण्याचे सांगितले. दरम्यान, शहरात प्रतिबंधात्मक उपाय नागरिकांना माहिती होण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी बॅनर लावण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. 

नक्की वाचा :"कोरोना' व्हायरसमूळे जमावबंदी... शरद पवारांचा दौरा स्थगित 
 


महापालिकेतही बैठक 
खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व मांस विक्रेत्यांना स्वच्छतेसंदर्भात नोटीस पाठवावी, तसेच शाळा, महाविद्यालयात जनजागृती करावी, अशा सूचना महापौरांनी दुपारी दोनला त्यांच्या दालनात महापालिकेच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठकीत दिल्या. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, महापालिका आरोग्य समितीचे सदस्य डॉ. वीरेन खडके, डॉ. चंद्रशेखर पाटील, महेश चौधरी यांच्यासह उपायुक्त मिनानाथ दंडवते, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी, शहर लसीकरण अधिकारी डॉ. मनीषा उगले, डॉ. शिरीष ठुसे, डॉ. नेहा भारंबे, डॉ. विजय घोलप, डॉ. संजय पाटील, डॉ. युधिष्ठिर इंगळे, डॉ. पल्लवी पाटील, डॉ. पल्लवी नारखेडे, डॉ. सोनल कुलकर्णी, डॉ. सायली पवार, डॉ. हेमलता नेवे आदी उपस्थित होते. 

क्‍लिक कराः  शिवाजीनगरात रस्त्यातील अतिक्रमणांवर हातोडा ! 
 

मनपा रुग्णालयामार्फत जनजागृती 
मनपाच्या रूग्णालयामार्फत "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर स्त्रोत, प्रसार माध्यम, लक्षणे, निदान, प्रतिबंध, उपचार, गैरसमज आदींबाबत नागरिकांना माहिती द्यावी. जनजागृतीसाठी परिचारिका व आशा सेविकांची मदत घ्यावी, संशयित रुग्ण आढळून आल्यास तत्काळ त्याचे नमुने घेऊन पुण्याला तपासणीसाठी पाठवा, अशा सूचना महापौरांनी दिल्या. 
 

loading image