"परिवर्तन चॅलेंज'मधून लिहा "आनंदाचे क्षण' 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 May 2020

परिवर्तन संस्थेने लिखाणाचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी रसिकांसाठी अनोखा उपक्रम खुला केला आहे. परिवर्तनमधील सदस्यांसाठी सुरू केलेल्या या उपक्रमाला बाहेरून देखील प्रतिसाद मिळू लागला.

जळगाव : "लॉकडाउन' म्हणजे कंटाळवाणा, घरात बसून बसून कंटाळा येतोय. ना कुठे कार्यक्रमाला जाणे ना कुठे फिरस्ती...अशात आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी बरेचजण फोटो पाहण्यात वेळ घालवतात. तर जुन्या आठवणी एकमेकांना सांगत असतात. असाच एक उपक्रम "परिवर्तन'ने "आनंदाचे क्षण'च्या माध्यमातून सुरू केला आहे. अर्थात जे लेखक नाही, अशांना देखील हे एक लिहिण्यासाठीचे व्यासपीठ खुले केले आहे. याला प्रतिसाद देखील मिळत आहे. 

नक्‍की पहा -  मुंबई ते धुळे...आधुनिक श्रावणबाळाने चक्क वृध्द पित्याला नेले खांद्यावर 

जळगाव परिवर्तन संस्थेने लिखाणाचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी रसिकांसाठी अनोखा उपक्रम खुला केला आहे. परिवर्तनमधील सदस्यांसाठी सुरू केलेल्या या उपक्रमाला बाहेरून देखील प्रतिसाद मिळू लागला. यामुळे "परिवर्तन जळगाव' या फेसबुक पेजवर "परिवर्तन चॅलेंज' या पेजवर खुले व्यासपीठ सुरू झाले. गेल्या महिनाभरापासून फेसबुक युजर्ससाठी हे खुले केले असून, यास प्रतिसाद देखील तसा मिळत आहे. 

अन्‌ आनंदातील आठवणी उमटल्या 
"परिवर्तन'ने आपल्यापुरता मर्यादित ठेवलेला हा उपक्रम एका विचारातून सर्वांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला. अर्थात यात काही कायम लिखाण करणारे तर काहीजण कधीही लिखाण न करणाऱ्यांनी देखील "परिवर्तन आनंदाचे क्षण' यावर लिहिण्यास सुरवात केली. परिवर्तनच्या या उपक्रमाला महाराष्ट्रातूनच नाही तर महाराष्ट्र बाहेरून देखील चांगला प्रतिसाद देखील मिळू लागला. आतापर्यंत यात 70 जणांनी लिखाण करून आपल्या जुन्या आठवणीतील आनंदाचे क्षण लिखाणातून उतरवले आहेत. 

"ई- बुक' तयार करणार 
हा अनोखा उपक्रम सुरू करताना त्याची संपूर्ण जबाबदारी परिवर्तनचे ज्ञानेश्‍वर शेंडे यांच्याकडे देण्यात आली. परिवर्तनच्या पेजवर लिखाण करणाऱ्यांची माहिती साठविली जात आहे. लॉकडाउनच्या काळात यावर आनंदाचे क्षण मांडणाऱ्यांचे काही किस्से, गंमती- जंमती मांडल्या जात आहेत. या साऱ्यांचे एकत्रीकरण करून त्याचे पुस्तक प्रकाशन किंवा ई- बुक तयार करण्याचा मानस परिवर्तनचा आहे. याची संपूर्ण जबाबदारी ही ज्ञानेश्‍वर शेंडे सांभाळणार आहेत. 

परिवर्तन ग्रुप'साठी उपक्रम सुरू केला होता. त्यास बाहेरून देखील प्रतिसाद मिळत गेला. आठवणीतले क्षण सांगायला लोकांना आवडले, यातून हे सगळ्यांसाठी खुले केले. आता महाराष्ट्र व बाहेरून देखील प्रतिसाद मिळत आहे. 
- मंजूषा भिडे, सदस्य, परिवर्तन जळगाव. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon lockdown parivartan challange writing facebook page