म्हणून प्राध्यापकच म्हणू लागला "मै हू डीन'

medical collage
medical collage

जळगाव : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी कोल्हापूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले होते. मात्र गजभिये यांची बदली रोखण्यात आली असल्याचे सांगून त्या पुन्हा कोल्हापूर येथे आपल्या पदावर रुजू झाल्या. एकीकडे शासनाकडून आदेश जारी केले जातात, संबंधित डीन पदभार घेण्यासाठी निघतात... अन्‌ रस्त्यात त्यांना निरोप आधीच्याच जागी परतण्याचा येतो.. शासन व लोकप्रतिनिधींना कोरोनाच्या संकटकाळी स्थितीचे गांभीर्य नसल्याचे द्योतक या प्रकारातून समोर आले. या खेळखंडोब्याने कोरोनाचा उद्रेक नियंत्रणात येणार नाही. 

जिल्ह्यात कोरोनाबाधित मृत्यूचे प्रमाण राज्यात सर्वाधिक असल्याने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठातापदी कोल्हापूरच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांची नियुक्तीचे आदेश काढण्यात आले होते. रविवारी (ता. 24) रात्रीच्या सुमारास डॉ. गजभिये यांनी आपल्या पदाचा कारभार प्रभारींकडे सोपवून त्या जळगावला येण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र, त्यांना आहे त्याच ठिकाणी पुन्हा रुजू व्हावे असे तोंडी आदेश मिळाले. त्यामुळे जळगावला पूर्वीपासूनच येण्यास इच्छुक नसलेल्या डॉ. गजभिये तत्काळ माघारी फिरल्या, आणि पूर्वपदावर पुन्हा रुजू झाल्या. त्यामुळे जिल्ह्यात अधिष्ठातांच्या बदलीवरुन झालेला गोंधळ चव्हाट्यावर आला. 

घोळ सुरूच 
कोरोनाचा संसर्ग वाढतच असल्याने एकीकडे राज्यासह जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत बिकट होत आहे. मात्र, दुसरीकडे प्रशासनाकडून आदेश देऊनही नियुक्त अधिष्ठाता रुजू होण्यास तयार नसल्याने डीन बदलीचा घोळ सुरूच असल्याने प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची स्थिती जळगावात दिसून येत आहे. 

पदभार पुन्हा खैरेंकडे 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांना आपल्या मूळ पदावर कार्यरत होऊन त्यांच्या जागी डॉ. गजभिये यांची नियुक्ती करण्यात आली होती. हे आदेश आल्यानंतर डॉ. खैरे हे आपला पदभार प्रभारी डीन डॉ. मारोती पोटे यांच्याकडे सोपवून दोन दिवसांच्या सुट्टीवर होते. मात्र ते शासकीय रुग्णालयात पुन्हा रुजू झाले असून त्यांच्याकडे पुन्हा अधिष्ठाता पदाचा कारभार सोपविण्यात आला. त्यामुळे शासकीय रुग्णालयात या महत्त्वाच्या पदावर सर्व गोलमाल सुरू असल्याचे दिसून येत आहे. 

प्राध्यापकही गाजवतोय हक्क 
एकीकडे महाविद्यालयात डीनच्या नियुक्तीबाबत सावळा गोंधळ सुरू आहे. तर दुसरीकडे रिक्त असलेल्या डीन यांचा पदभार शरीरशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. चंद्रशेखर डांगे यांनी मीच डीन असल्याचे सांगत खुर्चीवर आपला हक्क गाजविला. हा संपूर्ण प्रकार गेली दोन दिवस सुरू असून लोकप्रतिनीधींसह प्रशासनाकडून याची कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने लोकप्रतिनिधी देखील मूग गिळून गप्प बसल्याची परिस्थिती दिसून येत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com