शिवकॉलनी बोगद्यासाठी "न्हाई'च्या अधिकाऱ्यांना घेराव 

NHAI
NHAI

जळगाव : शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणात शिवकॉलनीतील नागरिकांना जाण्या-येण्यासाठी स्वतंत्र बोगदे असावेत, या मागणीसाठी आज महापालिकेचे प्रभाग समिती सदस्य रवींद्र नेरपगारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक सी. एम. सिन्हा यांना नागरिकांनी सकाळी घेराव घातला. बोगदे तयार करण्याच्या प्रस्तावास अधिकाऱ्यांनी तूर्त मान्यता देत चौपदरीकरणाच्या मार्गावरील खडी काढून घेण्यात आली. 


सुमारे दहा-बारा वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गाच्या पलीकडे फारशी नागरी वस्ती नव्हती. आता मात्र निम्म्यापेक्षा अधिक जळगाव शहर महामार्गाच्या पलीकडे वसले आहे. दररोज या नागरिकांना महामार्ग ओलांडूनच ये-जा करावी लागते. महामार्गावरील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे शिवकॉलनी होय. शिवकॉलनीसह आशाबाबानगर, हरीविठ्ठलनगर, आर. एम. एस. कॉलनीत जाताना महामार्गावरूनच जावे लागते. सुमारे पंचवीस ते तीस हजार लोकवस्ती येथे असताना शिवकॉलनीसमोर बोगदा अधिकाऱ्यांनी तयार केला नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. शिवकॉलनीसमोर व रेल्वे बोगद्याला समांतर असे दोन बोगदे तयार करण्याची मागणी करण्यात आली; अन्यथा पुन्हा आंदोलन छेडले जाईल, असे सांगण्यात आले. 


श्री. सिन्हा यांच्यासमोर समस्या मांडून निवेदन देण्यात आले. श्री. नेरपगारे, माजी महापौर सीमा भोळे, डॉ. सुरेश राणे, ऍड. प्रभाकर सुपे, चंद्रकांत चौधरी, लीलाधर तळेले, राजेंद्र अत्रे, अशोक देशमुख, कलाबाई पालवे, छाया गडे, अनिता पाटील, सुनंदा पवार, अनिता अग्निहोत्री, भिकन हिवराळे, पंकज पाटील, योगेश गालफाडे, विनोद ढगे, उदय पाटील, भरत सैंदाणे, अंचल सारस्वत, ऍड. विनायक पाटील, मालती सोनवणे यांसह शिवकॉलनी परिसर मित्रमंडळ, प्रसन्न ज्येष्ठ नागरी मंडळ, वृंदावन मित्रमंडळ, आशाबाबानगर मित्रमंडळ, अष्टभुजा आरएमएस कॉलनी मित्रमंडळ, चांदनी चौक मित्रमंडळ, एकात्मता मित्रमंडळ, सिद्धी गणेश मंदिर बहुद्देशीय संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com