"कोरोना'ग्रस्तांच्या मदतीसाठी  ऑस्ट्रेलियातील अनिवासी भारतीय सरसावले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

ऑस्ट्रेलियातील अनिवासी भारतीयांना नेहमीप्रमाणे मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते. त्याला भरभरून प्रतिसाद देत अनिवासी भारतीय "कृती'च्या कार्यात सहभागी झाले आहेत.

जळगाव  : सातासमुद्रापार वास्तव्यास असलेल्या ऑस्ट्रेलियातील अनिवासी भारतीयांनी मायभूमीवर आलेल्या कोरोनाविरूध्दच्या लढाईत "कोविड-19 रिलिफ' या मोहिमेत सहभाग नोंदवला आहे. 

नक्की वाचा :  डोळ्यासमोर बहिणेचे झाले अपहरण... अन्‌ चार जिल्ह्यातील पोलिस उतरले महामार्गावर ! 
 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिसून आल्यापासून ऑस्ट्रेलियातील अनिवासी भारतीयांच्या माध्यमातून "कृती फाउंडेशन' समाजातील निराधार, निराश्रित, वंचित, दुर्लक्षित व गरजू लोकांच्या मदतीसाठी अनेकविध उपक्रम राबवीत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने प्रशासकीय सेवेत प्रथम आघाडीवर काम करणाऱ्यांना पोलिस प्रशासन, अग्निशमन, आरोग्य सेवा, टपाल सेवा, सफाई कामगार कर्मचाऱ्यांना 

सॅनिटायझर, मास्क, पाण्याच्या बाटल्या वाटप, तसेच मोलमजुरी करणारे श्रमिक, घरकाम करणाऱ्या महिला, वीटभट्टी मजूर, बांधकाम क्षेत्रातील मजूर, समाजातील दुर्लक्षितांना किराणा वाटप केला. मधुमेही, उच्च रक्तदाब, ह्रदय रोगीसारख्या अति संवेदनशील रुग्णांना डिजिटल मार्गदर्शन व समुपदेशन केले. कोरोनामुळे लहान मुलांमध्ये कोरोनाबाबत जागृती व्हावी म्हणून ग्लोबल चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणे यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे. 

कृती फाउंडेशनची एक टीम ऑस्ट्रेलियामध्ये "कृती वेल्फेअर ऑस्ट्रेलिया' या नावाने भारतातील महिला, ज्येष्ठ नागरिक व बालक सतत विविध प्रकारच्या कार्यक्रमातून मायभुमीतील या घटकांसाठी निधी संकलित करीत आहेत. भारतात आलेल्या कोविड-19 च्या संकटाचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियातील अनिवासी भारतीयांना नेहमीप्रमाणे मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते. त्याला भरभरून प्रतिसाद देत अनिवासी भारतीय "कृती'च्या कार्यात सहभागी झाले आहेत. "कृती वेल्फेअर ऑस्ट्रेलिया'चे संस्थापक शेखर महाजन व स्वप्ना महाजन यांच्या नेतृत्वाखाली भारतातील महिला, ज्येष्ठ नागरिक व बालकांच्या पुनःरूत्थानासाठी सतत विविध प्रकारच्या कार्यक्रमातून मायभुमीतील या घटकांसाठी निधी संकलित करीत आहेत. 

क्‍लिक कराः यावल टायगर कॉरिडोर बनलाय संवेदनशील 
 

यांनी केले सहकार्य 
प्रशांत बेर्डे, आनंद शेवाळे, नलिनी महाजन, भाऊसाहेब पाटील, विशाल गोकुळे, सिद्धी महाजन, 
नितीन चौधरी, रवी चुत्तर, जान्हवी महाजन, रूपेश दारवटकर, अनिल कांदळकर, योगेश चव्हाण, अतुल जमदाडे, चैतन्य पेशवे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Non-resident Indians in Australia rushed to help the Corona victims