"कोरोना' लढ्यात आता शिक्षकांची मदत घेणार; काय आहे "कोविड गार्ड' संकल्पना वाचा...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 April 2020

नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी पोलिस यंत्रणा काम करीत आहे. त्यांना मदतीसाठी शिक्षक "कोवीड गार्ड' म्हणून स्वयंसेवकांच्या माध्यमातून काम करू शकतात. समाजहितासाठी प्रशासनास मदतीचा हात देता येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत आवाहन केले आहे, त्यामुळे आपण अशा स्थितीत प्रशासनाबरोबर राहणे आपले कर्तव्यच ठरेल. ही सेवा सक्तीची नसून स्वेच्छेने काम करण्याची आहे.

नंदुरबार : कोरोना विषाणूच्या लढ्यात शासनाच्या सर्व यंत्रणा दिवसरात्र राबत असून पोलिसांवरील ताणही वाढला आहे. त्यामुळे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पोलिस बांधवांना मदतीसाठी कोविड गार्ड म्हणून स्वयंसेवक म्हणून मदत करू शकतो, ही सेवा स्वेच्छेने असून यसाठी योगदान देऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधावा असे आवाहन शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम यांनी केले आहे. 
 

 

क्वारंटाईन केलेल्या दोघांचा आदर्शवत उपक्रम 

 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यात आरोग्य विभागातील डॉक्‍टर्स व कर्मचारी काम करीत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी पोलिस यंत्रणा काम करीत आहे.त्यांना आपण मदतीसाठी कोवीड गार्ड म्हणून स्वयंसेवकांच्या माध्यमातून काम करू शकतो. 

 

"एनआयसी'चे यश...लॉकडाउनमध्ये उद्योगांना घरबसल्या "ई-परवाना'

 

स्वेच्छेने मदतीचा पर्याय 
समाजहितासाठी प्रशासनास मदतीचा हात देता येईल. जिल्हाधिकारींनी त्याबाबत आवाहन केले आहे, त्यामुळे आपण अशा स्थितीत प्रशासनाबरोबर राहणे आपले कर्तव्यच ठरेल. ही सेवा सक्तीची नसून स्वेच्छेने काम करण्याची आहे. महिला शिक्षकांचा तूर्त यात समावेश नाही. 

हॉटेल व्यावसायिकांना हवी वीज बिल, "जीएसटी'ची माफी

...या लिंकवर भरा माहिती 
आपल्या गटात जे शिक्षक वय वर्षे 45 च्या आतील आहेत त्यांनी आपली माहिती भरून गटशिक्षणाधिकारींकडे बुधवारपर्यंत (ता. 22) जमा करावी. गटशिक्षणाधिकारींनी ते फॉर्म ईमेलने ssanandurbarl@yahoo.co.in यावर व खास दुताकरवी या कार्यालयास सादर करावीत व गुगल लिंकवर ही माहिती भरता येईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon now take the help of teachers in the Corona fight