esakal | रेशन दुकानांवर केशरी शिधापत्रीका धारकांना धान्य वाटप सुरू ! 
sakal

बोलून बातमी शोधा

ration

केशरी कार्ड धारक ज्यांची नोंद युनिट रजिष्टरमध्ये अशांना 1 मेपासून धान्य वाटप सुरू झाले आहे. युनिट रजिष्टर प्रत्येक दुकानदारांना तहसीलदारांनी पाठविले आहे. सोशल डिस्टन्स ठेवून गर्दी न करता कार्ड धारकांनी धान्य घ्यावे. 
सुनील सूर्यवंशी 
जिल्हा पुरवठा अधिकारी 

रेशन दुकानांवर केशरी शिधापत्रीका धारकांना धान्य वाटप सुरू ! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव ः राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत एपीएल केशरी शिधापत्रिका धारकांसाठी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत मे महिन्याचे धान्य वाटप सुरू झाले आहे. जिल्ह्यात तीन लाख बारा हजार 649 केशरी कार्ड धारक आहे. 13 लाख 47 हजार 83 हजार लाभार्थ्यांसाठी शासनाने 6 हजार 739 मेट्रीक टन धान्य पाठविले आहे. 

नक्की वाचा : "आरोग्य सेतु ऍप' पाकिस्थानी हॅकर कडून हॅक? 
 

कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर रेशन दुकानांच्या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी मे महिन्यात कालपासून (ता.1) ते 10 मे या कालावधीत एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांसाठी धान्य वाटप सुरू झाले आहे. 

डी-1 रजिष्टरला नोंद असेल तरच धान्य 
केशरी शिधापत्रिकाधारक पात्र लाभार्थ्यांची यादी असलेले डी-1 रजिष्टरनुसार शिधापत्रिकेत नमूद सदस्यांनाच सवलतीच्या दराने अन्नधान्य मिळेल. डी-1रजिष्टरला नोंद नसल्यास धान्य मिळणार नाही. अशा कार्डधारकांनी जुने कार्ड तहसील कार्यालयात जमा करावे. अशा कार्डांची चौकशी करण्यात येऊन कडक कारवाई करण्यात येईल. या लाभार्थ्यांनी नवीन पुरावे देऊन रीतसर नवीन कार्ड काढून घ्यावे. 

आर्वजून पहा : जळगाव शहरात दोन कोरोना बाधित रूग्ण 
 

इतरांना या तारखेत मिळेल धान्य.. 
11 ते 20 मे-- अंत्योदय, प्राधान्य कुटुंब 
21 ते 31 मे--अंत्योदय, प्राधान्य कुटुंब योजना लाभार्थ्यांना मोफत तांदूळ वाटप करण्यात येईल 
21 ते 31 मे--राहिलेले एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक, अंत्योदय, प्राधान्य कुटुंब योजना लाभार्थ्यांना नियमित देय, मोफतचे धान्य मिळेल. 

पाच किलो धान्य.. 
केशरी कार्ड धारकांना 8 रुपये प्रति किलो दराने गहू, प्रती सदस्य 3 किलो आणि 12 रुपये प्रति किलो दराने तांदूळ, प्रती सदस्य 2 किलो असे एकूण 5 किलो धान्य प्रति सदस्यास मिळणार आहे. 

क्‍लिक कराः बनावट पास घेवून कारमधून प्रवास...पोलिसांनी घेतले ताब्यात 
 

loading image