अरे बापरे.. जिल्हाधिकारी कार्यालयात सिलिंगचे पीओपी खाली कोसळले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 एप्रिल 2020

बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दोन तीन वेळा फोन करून माहिती दिली. मात्र अधिकारी आले नाही. एक वायरमन येऊन त्याने वायरकाढून घेतल्या.

जळगाव : येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेले सह उपनिबंधक कार्यालयातील (विवाह नोंदणी) सिलींगचे "पीओपी' अचानक कोसळल्याची घटना आज घडली. मात्र कार्यालयात कोणी नसल्याने दुदैवी टळली आहे. जर कार्यालय सुरू असते व त्यावेळी पीओपी कोसळले असते तर सह उपनिबंधक अधिकारी (वर्ग 2), दोन कर्मचाऱ्यांच्या जिवावर बेतले असते, सोबतच नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांनाही दुखापत झाली असती, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

 आर्वजून पहा : खायला नाही..प्यायला नाही जन्मदात्याला चिंता...शेवटी मुलींचा केला खून ! 

जिल्हाधिकारी कार्यालयातील विवाह नोंदणी कार्यालय सध्या लॉकडाऊनमुळे बंद आहे. मात्र शासनाचे हे कार्यालय सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्याने आज सकाळी कार्यालयाचा शिपाई आला असता त्याला कार्यालयातील सह उपनिबंधक अधिकारी बसतात त्या ठिकाणचे पीओपी कोसळलेले दिसले. त्याने लागलीच सह उपनिबंधक किरण चौधरी यांना बोलावून प्रकार दाखविला. श्री.चौधरी यांनी बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दोन तीन वेळा फोन करून माहिती दिली. मात्र अधिकारी आले नाही. एक वायरमन येऊन त्याने वायरकाढून घेतल्या. सायंकाळपर्यंत बांधकाम विभागाचा एकही अभियंता कार्यालयात आलेला नव्हता. 

संगणक, प्रिंटरचे नुकसान 
पीओपी पडल्याठिकाणचे दोन संगणक, प्रिंटर व इतर वस्तूंचे नुकसान झाले आहे. त्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांना माहिती देण्यात आली आहे. 

क्‍लिक कराः  हजारो सिकलसेल रुग्णांचा जीव टांगणीला...गोळ्या पुण्यात अडकून
 

बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा 
बांधकाम विभागाकडे शासकीय इमारतीच्या देखभाल दुरुस्तीचे काम असते. यामुळे सहनिबंधक चौधरी यांनी बांधकाम विभागाच्या कार्यालयात फोन लावला असता फोन उचलला नाही. संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला असता टोलवाटोलवी करण्यात आली. वर्षभरापूर्वीच पीओपीचे काम बांधकाम विभागाने केले होते. ते अचानक पडले कसे ? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जर कार्यालय सुरू असते ते अनेकांच्या जिवावर बेतले असते. याप्रकरणाची चौकशीची मागणी होत आहे. 

नक्की वाचा :"लॉकडाउन'मध्ये मद्य तस्करी...दुकानानंतर गुदामाचा परवानाही रद्द ! 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon The POP of the ceiling fell down at the Collector's office