रामनवमीला प्रथमच मंदिर सुने- सुने; केवळ झाली पुजा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 एप्रिल 2020

धार्मिक स्थळही बंद करण्यात आली आहे. परिणामी धुमधडाक्‍यात साजरे होणारे उत्सव देखील शांततेत साजरे केले जात आहेत. त्यानुसारच यंदा इतिहासात प्रथमच जळगावातील प्रमुख राममंदिरांमध्ये श्रीराम नवमीचा उत्सव साजरा झाला नाही.

जळगाव : कधी नव्हे तो उत्सवाला विराम लागला आहे. अगदी मंदिर स्थापनेपासून दरवर्षी उत्साहात साजरा होणारा श्रीराम जन्मोत्सव आज अगदीच शांततेत झाला. श्रीराम नवमीच्या दिवशी श्रीराम मंदिरात दुपारी बाराला बाराला होणारा उत्सव कोरोनामुळे केवळ पुजा अर्चा करूनच साजरा झाला. 

नक्‍की पहा -आठ हजार ऊसतोड अडकले परजिल्ह्यात

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे धार्मिक स्थळही बंद करण्यात आली आहे. परिणामी धुमधडाक्‍यात साजरे होणारे उत्सव देखील शांततेत साजरे केले जात आहेत. त्यानुसारच यंदा इतिहासात प्रथमच जळगावातील प्रमुख राममंदिरांमध्ये श्रीराम नवमीचा उत्सव साजरा झाला नाही. जुन्या गावातील श्रीराम मंदिर संस्थान व चिमुकले राम मंदिरात पुजन करूनच उत्सव साजरा केला. 

हेपण वाचा -संकटात तुमचा नगरसेवक संपर्कात आहे का? 

गजबजणारे राम मंदिरात शांतता 
चैत्र शुद्ध नवमीला श्रीराम नवमी साजरी केली जाते. शहरातील जुन्या जळगावातील श्रीराम मंदिर संस्थान व चिमुकले श्रीराम मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा केला जातो. दुपारी बारा वाजेच्या मुहूर्तावर पाडण्यात प्रभू श्रीरामांची मुर्ती ठेवून उत्सव साजरा होतो. या सोहळ्याला हजारो भाविकांची उपस्थिती लाभत असते. परंतु सध्याच्या कोरोना व्हायरसमुळे घेण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर मंदिर बंद आहेत. परिणामी रामजन्म सोहळा यंदा झालाच नाही. यामुळे दरवर्षी श्रीराम नवमीला गजबजणारे श्रीराम मंदिर यंदा सुने सुनेच राहिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon ram navami utsav not celebrate tempal